ban on cockfight sport : कोंबड्यांच्या झुंजीवरील बंदी कायम – नागपूर खंडपीठ | पुढारी

ban on cockfight sport : कोंबड्यांच्या झुंजीवरील बंदी कायम - नागपूर खंडपीठ

कोंबड्यांच्या झुंजीवरील बंदी कायम - नागपूर खंडपीठ

पुढारी ऑनलाईन – कोंबड्यांच्या झुंजीवर राज्यात असणारी बंदी उठवण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नकार दिला आहे. हा खेळ क्रुर असून कितीही प्रयत्न केला तर कोबंड्यांबद्दलची क्रुरता रोखता येणार नाही, असे खंडपीठाने म्हटले आहे. (ban on cockfight sport)

गजेंद्र चाचरकर यांनी ही याचिका दाखल केली होती. हा खेळा पारंपरिक असून महाराष्ट्रातील विविध भागांत प्रसिद्ध आहे, असे याचिकाकर्त्याने म्हटले होते. या खेळात जरी क्रुरता असली तरी नियम आणि अटी लादून ही क्रुरता टाळता येऊ शकते, असेही त्यांनी म्हटले होते.पण न्यायमूर्ती एस. बी. शुक्रे आणि जी. ए. सानप यांनी ही याचिका फेटाळून लावली.

“काही खेळ, परंपरा अनादी काळापासून सुरू आहेत, या एकाच कारणाने सुरू ठेवता येणार नाहीत. बालविवाहसारख्या प्रथा कायद्याने बंद करण्यात आल्या. नियम आणि अटींने दोन जिवंत प्राण्यातील लढाई कमी क्रुर करता येईल, हे न पटणारे आहे.” कोंबड्याच्या झुंजी हा खेळ Prevention of Cruelty to Animals Act, 1960च्या पूर्ण विरोधात आहे, त्यामुळे न्यायालय यात हस्तक्षेप करणार नाही, असेही न्‍यायालयाने यावेळी स्‍पष्‍ट केले.

हेही वाचा

Back to top button