औरंगाबाद : ईसारवाडी येथे वाहनाच्या धडकेत पादचारी ठार | पुढारी

औरंगाबाद : ईसारवाडी येथे वाहनाच्या धडकेत पादचारी ठार

पैठण; पुढारी वृत्तसेवा : पैठण एमआयडीसी लागत असलेल्या ईसारवाडी रोडवर अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्यामुळे पादचाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्री घडली. नासीर हनीफ शेख (वय ३६, रा. विहामांडवा, ह. मु ईसारवाडी, ता.पैठण) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, एमआयडीसी पैठण परिसरातील ईसारवाडी रोड लगतच्या स्मशानभूमी जवळ मंगळवारी रात्री १० च्या सुमारास नासीर शेख पायी पिंपळवाडी येथे जात होते. यावेळी औरंगाबादकडून येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली.

या अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे, बीट जमादार करतारसिंग सिंगल, विष्णू बापाते यांनी अपघात स्थळी जाऊन जखमी नासीर शेखला पैठण येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकारी यांनी जखमी शेख यांना तपासून मयत घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास बीट जमादार करतारसिंग सिंगल करीत आहे.

हेही वाचलंत का ?  

Back to top button