औरंगाबाद : जायकवाडी येथील नाथसागर धरणात ४५ हजार क्युसेक पाण्याची आवक | पुढारी

औरंगाबाद : जायकवाडी येथील नाथसागर धरणात ४५ हजार क्युसेक पाण्याची आवक

पैठण; पुढारी वृत्तसेवा : पैठण जायकवाडी येथील नाथसागर धरणाच्या पाणी लोट क्षेत्रातील वरील भागात गेल्या तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक मंगळवारी ( दि.१२) रोजी दुपारपर्यंत १७ हजार १५० क्युसेक असल्याची नोंद झाली. तर मध्यरात्री उशिराने वरील भागातील छोट्या- मोठ्या धरणातून जवळपास ४५ हजार क्युसेक पाण्याची आवक सुरू होणार असल्याची माहिती धरण नियंत्रण कक्षाचे शाखा अभियंता विजय काकडे यांनी दिली आहे. येणाऱ्या पाण्याची आवक लक्षात घेता पाटबंधारे धरण विभागातील सर्व कर्मचारी सतर्क ठेवण्याचा आदेश कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी दिला आहे.

गेला तीन दिवसांपासून पैठण तालुक्यासह जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्राच्या वरील भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्यामुळे नाशिक व नांदूर मधमेश्वर प्रकल्पातून जायकवाडी नाथसागर धरणाकडे मोठ्या गतीने पाणी वाहत आहे. या पाण्याची आवक येथील धरणामध्ये मध्यरात्री पोहोचणार असल्याने पाटबंधारे विभागाचे सर्व कर्मचारी सतर्क ठेवण्याचा आदेश कार्यकारी अभियंता यांना दिले आहेत.

दरम्यान, मंगळवारी रोजी दुपारी दोन वाजता धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक १७ हजार १५० क्युसेक नोंद नियंत्रण कक्षात करण्यात आली. मध्यरात्री उशिरापर्यंत वरील जवळपास ४५ क्युसेक पाण्याची आवक सुरू होणार आहे. आतापर्यंत नाथसागर धरणाची पाणी पातळी १५०८.०० फुटामध्ये नोंद असून त्याची टक्केवारी ३७.११ इतकी आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button