पिंपरी : ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू | पुढारी

पिंपरी : ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

पिंपरी : ट्रॅक्टरने धडक दिल्याने दुचाकी चालकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी बुधवारी (दि.29) चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनंजय तानाजी कलवडे (26, रा.कुरकुंडी तालुका खेड) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे वडील तानाजी रामभाऊ कलवडे (60) यांनी फिर्याद दिली आहे.

पीओपी गणेशमूर्तींना यंदा परवानगी; बंदी 2023 पासून

त्यानुसार, ट्रॅक्टर चालक याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी धनंजय 13 मे रोजी रात्री साडेसातच्या सुमारास त्याच्या दुचाकीवरून कोयेगाव येथून जात होता. दरम्यान, ट्रॅक्टरने त्याला जोरदार धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने धनंजय याचा मृत्यू झाला. घटनेनंतर चालक फरार झाला आहे.

 

Back to top button