चीन सिंथेटिक ड्रग्ज चे सेंटर; मेक्सिको सेल्समन!

चीन सिंथेटिक ड्रग्ज चे सेंटर; मेक्सिको सेल्समन!
Published on
Updated on

मेक्सिको सिटी : वृत्तसंस्था जगभरात अवैध नशेच्या व्यवसायात 50 लाख कोटी रुपयांची उलाढाल वर्षाला होते. सर्दी-खोकल्याच्या औषधांत वापरल्या जाणार्‍या रसायनांच्या मदतीने कोकेन, हेरॉईन, केटामाईनपेक्षा कितीतरी पटीने अधिक मादक व स्वस्त असे ड्रग्ज बनविले जात आहेत. या ड्रग्जला सिंथेटिक ड्रग्ज म्हणतात. लहानसहान लॅबही हे ड्रग्ज बनविण्यासाठी पुरेशा असतात. कोकेन, हेरॉईन, गांजा, अफीमसाठी शेती कसावी लागते, तसे कष्ट आणि जोखीमही यात नाही.

अर्थात, सिंथेटिक ड्रग्ज ही काही अगदीच नवीन बाब नाही. कोरोनापूर्वी अनेक दशकांपासून ते चलनात आहेत. भारतातील पंजाबपासून ते हिमाचल प्रदेशपर्यंत ती विकलीही जातात. दुसरीकडे कोरोना-लॉकडाऊनच्या काळात नशेची पारंपरिक उत्पादने शेतापासून अंतिम ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यात माफिया टोळ्यांसमोर अनेक अडचणी उद्भवल्या होत्या. उदाहरणार्थ कोलंबियात एक किलो कोकेन तयार करायला 80 रुपये किलोच्या हिशेबाने 400 किलो कोकोची पाने खर्ची पडतात.

एकूण 32 हजार रुपयांच्या भांडवलावर तयार होणारे कोकेन 65 हजार रुपयांत घाऊक दराने खरेदी केले जाते. हेच कोकेन लास वेगासमधील ग्राहकाला तब्बल 1 कोटी रुपये किलो दराने विकले जाते. ते पोहोचविणे कोरोना काळात कठीण बनले होते. दुसरे म्हणजे पारंपरिक ड्रग्जमध्येही नफा कमी नसला तरी या व्यवसायाची सारी गणिते शेतीपासून सुरू होतात आणि नशेची शेती जोखमीची असते. यातून मग जेथे सिंथेटिक ड्रग्जचा एक पर्याय माफिया टोळ्यांनी निवडला आहे.

चीनचा यातील सहभाग कसा?

सर्वाधिक औषधे तयार करणार्‍या फॅक्टरींच्या संख्येत चीन जगात दुसर्‍या क्रमांकावर आहे. चीनमध्ये बड्या 5 हजार, तर तब्बल 4 लाख लहानमोठ्या फॅक्टरी आहेत. कोरोनापूर्वी चीनमधील माफियांकडून फेन्टॅनीलसारखे ड्रग्ज थेट अमेरिकेला पाठविले जात होते. 'मेथ'च्या नशेचे चलन चीनमध्ये वाढल्यानंतर तसेच अमेरिकेकडूनही कारवाई झाल्यानंतर चीन सरकारने चीनमधील या फॅक्टरींवर कारवाया सुरू केल्या. तेव्हा चीनमधील या औषध कंपन्यांनी माल अमेरिकेला पाठविण्याऐवजी मेक्सिकोत पाठविणे सुरू केले आणि आपल्याकडील (चीनमधील) फॅक्टरी भारतात हलवायला सुरुवात केली.

चिनीमाफियांचे कर लो दुनिया मुठ्ठीमें!
चीनमधील अंडरवर्ल्ड (माफिया) जगतातील म्होरक्यांनी आता जगभरातील नेते, उच्चपदस्थ अधिकार्‍यांवर आपले जाळे टाकले असून, त्यांना आपलेसे करायला सुरुवात केली आहे. 'सिनाओला' ही मेक्सिकोतील मोठी माफिया टोळी आहे. दक्षिण अमेरिकेतून ही टोळी वनसंपदा आणि सागरी संपदेची तस्करी चीनला करते आणि चीनमधून सिंथेटिक ड्रग्जसाठी लागणारी रसायने आयात करते.

रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम
गतवर्षी (2021) एप्रिल ते डिसेंबरदरम्यान भारतातून युक्रेन आणि रशियाला झालेल्या निर्यातीत अनुक्रमे 30 आणि 15 टक्के वाटा औषधांचा होता. रशिया-युक्रेन युद्धामुळे त्याला फटका बसला आहे. ड्रग माफियांसाठी मात्र ही इष्टापत्तीच आहे. कारण, रशिया-युक्रेनच्या रूपातील मोठे ग्राहक तुटल्याने भारतातील औषध कंपन्यांना नवीन ग्राहक शोधावे लागतील. ड्रग माफिया टोळ्या या कंपन्यांच्या ग्राहक ठरू शकतील.

निर्बंध घालणे का अशक्य?

सिंथेटिक ड्रग्जवर बंदी घालणे व ती राबविणे यंत्रणांसाठी जवळपास अशक्यप्राय बाब आहे. औषध कंपन्या ज्या रसायनांच्या मदतीने औषधे बनवितात, त्याच रसायनांच्या मदतीने सिंथेटिक ड्रग्ज तयार होतात. त्यामुळे या रसायनांवर निर्बंध घातल्यास औषध कंपन्यांना, उत्पादनांनाही त्याचा फटका बसेल.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news