पवारांनी पाहिला कोरोना योद्धा लंकेंचा लघुपट | पुढारी

पवारांनी पाहिला कोरोना योद्धा लंकेंचा लघुपट

पारनेर : पुढारी वृत्तसेवा

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांनी दोन वर्षाच्या काळात ज्येष्ठ नेते शरद पवार कोरोना सेंटरच्या माध्यमातून जवळपास 30 हजार 624 कोरोना बांधित रुग्ण ठणठणीत बरे केले. त्यामुळे आमदार लंके यांचे कोरोनात आदर्श काम माहिती पटाच्या माध्यमातून सोलापूरचे युवा अनुभवी दिग्दर्शक सुशील व दिग्दर्शिका अर्चना चाटे यांनी समाजापुढे मांडण्याचे काम केले आहे. या माहिती पटाचा श्रीगणेशा राष्ट्रवादी कॉग्रेसचे सर्वसर्वा शरद पवार यांनी कुटुंबीयांसमवेत पाहणी करून त्यांच्या कार्याची दखल घेतलीे.

सोलापूर : पंजाब बँकेची ९२ लाखांची फसवणुक; पिता-पुत्राविरूद्ध गुन्हा दाखल

आमदार लंके यांच्या संकल्पनेतून भाळवणी येथे उभे राहिलेल्या शरदचंद्र पवार आरोग्य मंदिरात 30 हजारावर रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे लंके यांच्या या आरोग्य मंदिराची चर्चा देश-विदेशातही पोहोचली आहे. त्यामुळे कोरोनात लंके यांच्या संघर्षमय व कौतुकास्पद कामगिरीवर प्रकाश टाकण्यासाठी माहितीपट प्रदर्शित केला. काही दिवसांपूर्वी वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस लंडनने पुरस्कार देऊन लंके यांचा सन्मान केला.

वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस या संस्थेच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षा फराह अहमद यांनी लंके यांना हा पुरस्कार प्रदान केला. त्यामुळे लंके यांच्या कार्याची दखलही चित्रपट जगताने घेतली. दुसरीकडे कोरोना रुग्णांसह इतर नातेवाईकांच्या मनातील भीती लंके यांनी घालविली असून, या आरोग्य मंदिरात उपचाराबरोबर मानसिक आधार देण्याचे काम केले.

कर्नाटक जांभळे पथ्यावर; स्वस्त असल्याने पल्प उद्योगासाठी उद्योजकांकडून खरेदी

दिग्गज कलाकारांसोबत दिग्दर्शक सुशील यांनी तयार केलेला लघुपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अर्चना चाटे या युवा दिग्दर्शिका मैत्रिणीने संपूर्ण माहिती गोळा केली. ही सर्व मंडळी पारनेर तालुक्यातील भाळवणीत पोहोचले. तेथील पवार कोरोना उपचार मंदिर हा फलक वाचून त्यांना आश्चर्य वाटले स्वयंसेवकांच्या कामाची जवळून माहिती घेता आली अन् या कामाची महती पटली.
या सर्व गोष्टी माहितीपटात त्यांनी टिपल्या. या कामाकरिता त्यांना अर्चना चाटे अमोल चोपडे, चित्तरंजन धळ, माया रोकडे, राजेश्वरी कोठावळे यांनी परिश्रम घेतले आहेत.

 

Back to top button