धक्कादायक! शेततळ्यात पडून ३ बालकांचा मृत्यू; शेटफळमधील घटना | पुढारी

धक्कादायक! शेततळ्यात पडून ३ बालकांचा मृत्यू; शेटफळमधील घटना

सोलापूर, पुढारी वृत्तसेवा : शेततळ्याच्या शेजारी खेळताना तोल जाऊन शेततळ्यात पडल्याने, एकाच कुटुंबातील तीन लहान मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोलापूर जिल्ह्यातील शेटफळ (ता.मोहोळ) येथे सोमवारी दुपारी ४ ते ५ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

माचणूर (ता. मंगळवेढा) येथील निकम कुटुंब हे शेटफळ येथील डोंगरे या शेतकऱ्याचा शेतात सालाने कामाला आहेत. तर हिंगमीरे हे शेटफळ येथीलच कुटुंब आहे, सोमवारी डोंगरे यांच्या शेतामध्ये डाळिंब तोडणीचे काम सुरू होते. दरम्यान कार्तिकेश हिंगमीरे, सिद्धार्थ निकम, विनायक निकम हे तिन्ही बालके शेततळ्याच्या शेजारी खेळत होती, ते बराच वेळ दिसली नाहीत, त्यांचा शोध घेतला असता  शेततळ्यात पडल्याचे दिसून आले.

त्या पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू झाला. ही घटना पाच वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. मोहोळ ग्रामीण रुग्णालयात या तीनही बालकांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. यापूर्वी सोलापूर जिल्ह्यातील मराठी गावात असेच ३ बालकांचा खेळत खेळत शेततळ्यामध्ये पडून मृत्यू झाला होता.

पहा व्हिडीओ : 2 वर्षात भोंगे, जेम्स लेन आठवावा असं काहीच घडलं नव्हतं 

Back to top button