नाशिक : बंदीवान, हाजीर हो…रजा घेऊन कारागृहाबाहेर असलेल्या कैद्यांना सूचना | पुढारी

नाशिक : बंदीवान, हाजीर हो...रजा घेऊन कारागृहाबाहेर असलेल्या कैद्यांना सूचना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यभरातील कारागृहांमधील बंदींना संचित आणि अभिवचन रजांवर सुरुवातीस 45 दिवस व त्यानंतर साथरोग प्रतिबंधक कायद्यांतर्गत 30 दिवसांच्या प्रमाणात रजेत वाढ केली होती. मात्र, फेब—ुवारी 2022 मध्ये सर्व अधिसूचना रद्द झाल्याने या रजाही बंद झाल्या आहेत. त्यानुसार कैद्यांना 15 दिवसांच्या आत कारागृहात परतण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नाशिक मध्यवर्ती कारागृहातील 800 कैदी या रजा घेऊन कारागृहाबाहेर आहेत.

कोरोनाचा संसर्गजन्य प्रादुर्भाव वाढल्याने मार्च 2020 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार समिती तयार करून कारागृहातील बंद्यांना 8 मे व 13 नोव्हेंबर 2020 च्या अधिसूचनेतील तरतुदी व अटी-शर्तींनुसार सुरुवातीस 45 दिवसांसाठी आकस्मिक अभिवचन रजेवर मुक्त करण्यात आले होते. त्यानंतर रजेचा कालावधी संपल्याने साथरोग प्रतिबंधक कायद्यांतर्गत 8 मे 2020 ची अधिसूचना रद्द करेपर्यंत 30 दिवसांच्या प्रमाणात रजेमध्ये वाढ करण्यात येत होती. दरम्यान, 10 फेब—ुवारी 2022 रोजी शासनाने मागील तरतुदी रद्द केल्याने कैद्यांच्या रजेसाठीची तरतूदही रद्द झाली आहे. त्यानुसार बंद्यांना दिलेल्या संचित व अभिवचन रजा रद्द झाल्या आहेत.

अहवालानंतरच कारागृहात दाखल
कोरोना आकस्मिक अभिवचन रजेवरील बंद्यांना कारागृहात दाखल करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार अभिवचन रजेवर मुक्त करण्यात आलेल्या सर्व बंद्यांना तत्काळ कारागृहात दाखल करून घ्यावे. बंद्यांना दाखल करून घेताना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक असून, बंद्यांनी शासकीय रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासणी केल्यानंतर अहवाल प्राप्त झाल्यानंतरच कारागृहात दाखल करून घेण्याचे आदेश आहेत.

हेही वाचा :

Back to top button