RLD : यूपीत पराभवाच्या धक्क्याने राष्ट्रीय लोक दलाने घेतला मोठा निर्णय; सर्व पक्षांतर्गत संघटना बरखास्त

RLD : यूपीत पराभवाच्या धक्क्याने राष्ट्रीय लोक दलाने घेतला मोठा निर्णय; सर्व पक्षांतर्गत संघटना बरखास्त

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेशच्या निवडणुकांमध्ये समाजवादी पक्षासोबत जाऊन राष्ट्रीय लोक दल या पक्षाने विधानसभेची निवडणूक लढवली. मात्र, त्यांना मोठ्या पराभवाला सामाेरे जावे लागले. त्यानंतर राष्ट्रीय लोक दल (RLD) या पक्षाचे अध्यक्ष जयंत चौधरी यांनी मोठा निर्यण घेतला आहे. पक्षाध्यक्ष चौधरी यांनी राज्य, जिल्हा आणि स्थानिक पातळीवरील सर्व पक्षीय संघटना बरखास्त केल्या आहे.

उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळात या घटनेने मोठी खळबळ सुरू झाली आहे. असं सांगितलं जात आहे की, "युपीमध्ये विधानसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय लोक दल या पक्षाचा सपाटून पराभव झाला आहे. या निराशेतूनच पक्षाध्यक्ष जयंत चौधरी यांनी हा निर्णय घेतलेला आहे."

उत्तर प्रदेशमध्ये यंदाच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय लोक दल ही समाजवादी पार्टीच्या युतीचा भाग होती. या युतीमध्ये सुभाषपा आणि प्रसपा या पक्षांसहीत आणखी चार पक्षही सहभागी होते. तर दुसरीकडे भाजपबरोबर अनुप्रिया पटेल यांनी अपना दल आणि डाॅ. संजय निषाद यांचा पक्षदेखील होता.

या निवडणुकीमध्ये भाजपाच्या युतीला प्रचंड बहुमत मिळाले. उत्तर प्रदेशमध्ये भाजपा युतीला एकूण २७३ जागा मिळाल्या, तर सपाच्या युतीला एकूण १२५ जागा मिळाल्या. यामध्ये राष्ट्रीय लोक दल पक्षाला केवळ आठ जागांवरच समाधान मानावे लागले होते. तसेच सुभासपा या पक्षाला केवळ ६ जागा मिळाल्या.

हे वाचलंत का ?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news