विदर्भ: वाशिम येथील एक विध्यार्थी युक्रेनमध्ये अडकला | पुढारी

विदर्भ: वाशिम येथील एक विध्यार्थी युक्रेनमध्ये अडकला

वाशिम (विदर्भ) पुढारी ऑनलाईन

वाशिम (विदर्भ) जिल्ह्यातील एक विर्द्यार्थी यूक्रेनमध्ये रुमानिया बॅार्डरला अडकला आहे. रशिया आणि युक्रेन या देशांमध्ये मागील काही दिवसांपासून संघर्ष सुरू आहे. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनमध्ये गेलेला हा युवक अडकल्याने पालक व नातेवाईक चिंतेत आहेत.

वाशिम शहरातील आयुडीपी कॉलनी येथील आम्लन प्रकाश व्यास हा विद्यार्थी एम बी बी एस चौथ्या वर्षासाठी युक्रेन मधील विनीतसा मध्ये शिक्षण घेण्यासाठी होता. मात्र मागील चार दिवसापासून रशिया आणि युक्रेन मध्ये युद्ध सुरू असून, त्यांना भारतात येण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. अद्याप या विद्यार्थ्यांना रोमानियाच्या सिमेवर प्रवेश मिळालेला नाही. दरम्यान तिथे खाण्यापिण्याची व्यवस्था नसल्याची माहिती मुलांकडून मिळाली आहे. त्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे.

रोमानियात प्रवेश मिळाल्यास तेथून भारताचे विमान मिळणार असल्याने या विद्यार्थ्यांना रोमानियामध्ये प्रवेश द्यावा आणि त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करावी, असे मत आमलनचे वडील प्रकाश व्यास यांनी व्यक्त केले. युक्रेन मध्ये युद्धजन्य परिस्थिती असल्याने प्रशासनाकडून महाराष्ट्रासह देशातील विद्यार्थ्यांना देशात सुखरूप आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

हेही वाचा

Back to top button