उदय लळीत सरन्यायाधीश पदाचा आज कार्यभार घेणार

उदय लळीत सरन्यायाधीश पदाचा आज कार्यभार घेणार
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : सर्वोच्च न्यायालयाचे ४९ वे सरन्यायाधीश म्हणून महाराष्ट्राचे सुपूत्र उदय लळीत हे शनिवारी कार्यभार हाती घेणार आहेत. तत्पूर्वी शुक्रवारी (दि.२६) मावळते सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांना निरोप देण्यात आला. न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या खटल्यांची संख्या हा चिंतेचा विषय असल्याचे रमणा यांनी आपल्या निरोपाच्या भाषणामध्ये सांगितले.

सोळा महिन्यांच्या कार्यकाळामध्ये केवळ पन्नास दिवसच पूर्णकालीन आणि प्रभावीपणे काम करता आले, याबद्दल माफी मागतो, असे रमणा यांनी सांगितले. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज प्रभावित झाले होते. यावर्षीच्या सुरुवातीला देखील आभासी मार्गानेच महत्वाच्या खटल्यांची सुनावणी होत होती. दरम्यान रमणा यांनी आज सुनावणी घेतलेल्या एका प्रकरणाचे लाईव्ह स्ट्रिमिंग करण्यात आले. न्यायालयात सुनावणी सुरु असलेल्या एखाद्या खटल्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग करण्याची ही पहिलीच वेळ होती, हे विशेष.

हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news