विमानातील दोन प्रवाशांचे महिला क्रू सोबत असभ्य वर्तन; दिल्ली-हैदराबाद फ्लाईटमधील प्रकार (Viral Video)

विमानातील दोन प्रवाशांचे महिला क्रू सोबत असभ्य वर्तन; दिल्ली-हैदराबाद फ्लाईटमधील प्रकार (Viral Video)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या काही दिवसांपासून विमानातील प्रवाशांच्या वर्तणुकीबाबतच्या घटना वारंवार पहायला मिळत आहेत. सोमवारी पुन्हा एकदा एक अशीच घटना पहायला मिळाली ज्याची व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाली आहे. दिल्ली ते हैदराबाद स्पाईसजेटच्या विमानामधील दोन प्रवाशांना 'असभ्य' वर्तणुकीमुळे उतरिवण्यात आले. या व्हिडिओमध्ये एक प्रवासी महिला कर्मचाऱ्यासोबत हुज्जत घालत असल्याचे दिसून येते.

एअरलाइनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका प्रवाशाने केबिन क्रूचा त्रास देत असल्याचे दिसून आले. त्यामुळे तो आणि त्याच्या सहप्रवासी या दोघांनाही विमानातून खाली उतरवण्यात आले. त्यानंतर दोन्ही प्रवाशांना सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले. (Viral Video)

"२३ जानेवारी २०२३ रोजी, स्पाईसजेटचे वेट-लीज्ड कोरेंडन विमान एसजी-८१३३ (दिल्ली-हैदराबाद) हे नियोजित होते. दिल्ली बोर्डिंगमध्ये या विमानात एका प्रवाशाने केबिन क्रूला त्रासदायक आणि अयोग्य रीतीने वागणूक दिली. क्रूने पीआयसी आणि सुरक्षा कर्मचार्‍यांना याची माहिती दिली. पीडित महिला कर्मचारीला त्रास देणाऱ्या प्रवासी आणि सहप्रवासी दोघांनाही सुरक्षा पथकाच्या स्वाधीन करण्यात आले," अशी माहिती स्पाइसजेटच्या अधिकाऱ्यांनी दिली.

याआधीचे प्रकरण (Viral Video)

नवी दिल्ली ते गोवा या GoFirst फ्लाइटमध्ये याआधी 5 जानेवारी रोजी दोन परदेशी प्रवाशांनी एका महिला फ्लाइट अटेंडंटसोबत गैरवर्तन केल्याची घटना घडली होती. या प्रकरणात काही परदेशी प्रवाशांनी एका एअर होस्टेसला त्यांच्यासोबत बसण्यास सांगितले होते. त्याचवेळी दुसऱ्या एका एअर होस्टेससोबत या प्रवाशांनी अश्लील शब्दात संवाद साधला. दोन्ही प्रवाशांना विमानतळ सुरक्षा एजन्सी सीआयएसएफकडे सोपवण्यात आले आणि या प्रकरणाची माहिती नियामक डीजीसीएला कळवण्यात आली.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news