सातव्या मुलीची सातवी मुलगी : अद्वैत-नेत्रा मनोरमाचं रहस्य शोधणार

सातव्या मुलीची सातवी मुलगी
सातव्या मुलीची सातवी मुलगी
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेने नुकतेच ३०० भाग पूर्ण केले आहेत. या मालिकेत दर आठवड्याला उत्सुकता वाढवणारं नवं वळण पहायला मिळतं. सध्या मनोरमा कोण या प्रश्नाने संपूर्ण महाराष्ट्राला कोड्यात टाकलं आहे. मनोरमा कोण आहे, याविषयी टप्याटप्याने प्रेक्षकांना एकेक गोष्ट ही मालिका पाहताना कळत आहे.

मनोरमाच्या रहस्याविषयी जाणून घेण्याची प्रेक्षकांची ओढ पाहून २० ऑगस्टच्या महाएपिसोडची रचना करण्यात आली आहे. मनोरमाच्या रहस्याला दिशा देणारा हा महाएपिसोड असणार आहे. अद्वैत-नेत्राला कळतं की मनोरमाला पद्माकर आजोबा आणि भालबा म्हणजेच आबा हे दोघेही ओळखतात. हा समान धागा पकडून अव्दैत-नेत्रा मनोरमाचं रहस्य शोधायला सुरुवात करतात.

मनोरमाचं राजाध्यक्षांच्या घरात नेत्राला दिसणं, पद्माकर आजोबांचं भूतकाळ आठवून अस्वस्थ होणं, इंद्राणीने रूपालीला आजोबांना मारायला सांगणं, नेत्राला दिसणाऱ्या मृत्यूच्या संकेतांची साखळी अशा महत्त्वपूर्ण गोष्टींचा उलगडा मालिकेत लवकरच होणार आहे.

अद्वैत-नेत्राने मनोरमाचा शोध घ्यायला सुरुवात केल्यामुळे मनोरमाचं सत्य काय, त्रिनयना देवीचं वरदान असलेली तिसरी स्त्री कोण असेल, मनोरमाचा आत्मा स्वतःहून नेत्राला हे सगळं सांगणार का… याची उत्तरंही प्रेक्षकांना मालिका पाहताना मिळणार आहेत. त्यासाठी महाएपिसोडमध्ये मनोरमाच्या रहस्यापर्यंत अद्वैत-नेत्रा कसे पोहोचणार हे पाहायलाच हवं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news