Ghoomer Film : हर्षा भोगले-अजिंक्य रहाणेने केलं घूमरचं कौतुक (Video)

ghoomer movie
ghoomer movie

पुढारी ऑनलाईन डेस्क : आर बाल्की दिग्दर्शित "घूमर"ची चर्चा सोशल मीडिया वर जोरदार होत असताना या चित्रपटाचं सर्वत्र कौतुक होतंय. (Ghoomer Film) प्रसिद्ध कॉमेंटर हर्ष भोगले आणि क्रिकेट पटू अजिंक्य रहाणे यांनी या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. ट्विटरवर या दोघांनी एक खास व्हिडिओ पोस्ट करून या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. चित्रपटाची कथा आणि कलाकारांचं विशेष कौतुक त्यांनी या खास व्हिडिओमधून करून चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत. (Ghoomer Film )

घुमर हा क्रिकेटवर आधारित चित्रपट असून अभिषेक बच्चन , सयामी खेर आणि अंगद बेदी दिग्गज अभिनेत्री शबाना आझमी यांच्या मुख्य भूमिका यात बघायला मिळणार आहेत. आर बाल्की यांच्या दिग्दर्शनाची अनोखी जादू या चित्रपटात बघायला मिळते. हर्षा यांनी चित्रपटाची कथा, कलाकार यांच्याबद्दल अनेक गोष्टी शेयर केल्या आहेत. चित्रपटाची उत्सुकता सगळ्यांना आहेच आणि हा चित्रपट उद्या चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news