

पुढारी ऑनलाईन डेस्क : शक्तीशाली भूकंपाचा तडाखा बसलेले तुर्कस्तान आणि सीरियात अद्याप हजारो नागरिक ढिगार्याखाली अडकले आहेत. काही क्षणात होताचं नव्हतं करणार्या या महासंकटाचा सामना दोन्ही देश करत आहेत. या नैसर्गिक आपत्तीमुळे हजारो कुटुंबे क्षणात उद्ध्वस्त झाली असून, आतापर्यंत ४३०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हजारो लोक जखमी झाले आहेत.
भूकंपामुळे झालेल्या विनाशानंतर आता त्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये एक बहुमजली इमारत काही सेकंदात पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळताना दिसत आहे. हा व्हिडिओ तुर्कस्तानच्या सॅनलिउर्फा प्रांतातील आहे.
भूकंपाचा केंद्रबिंदू तुर्कस्तानच्या गाझिनतेप प्रांतातील नुरदागी होता. हा भाग सीरियाच्या सीमेवर आहे. त्याचवेळी, भूकंपाच्या दुसऱ्या धक्क्याचे केंद्र तुर्कस्तानचा खारामनमारा प्रांत होता. ( Turkey buiding collapse ) या महाविनाश संकटानंतर तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांनी देशात सात दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. भारतासह जगातील अनेक देशांनी तुर्कस्तानला मदत पाठविण्यास प्रारंभ केला आहे.
पुढारी ऑनलाईन डेस्क : शक्तीशाली भूकंपाचा तडाखा बसलेले तुर्कस्तान आणि सीरियात अद्याप हजारो नागरिक
ढिगार्याखाली अडकले आहेत. २४ तासानंतरही मृतदेह मिळत असून युद्धपातळीवर मदतकार्य सुरु आहे. गंभीर जखमींना हवाई दलाच्या मदतीने उपचारासाठी अन्यत्र हलवले जात आहे. दरम्याम तुर्कीतील सानलिउर्फा प्रांतात तब्बल २२ तासानंतर ढिगार्याखाली सापडलेल्या महिलेची सुटका करण्यात आली.
तुर्कस्तानमधील १० हून अधिक प्रांतांना शक्तीशाली भूकंपाचा तडाखा बसला आहे. येथील ६२१७ हून अधिक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. सीरियातील अलेप्पो शहर उद्ध्वस्त झाल्याची माहिती सीरियातील सरकारी वृत्तसंस्था SANA ने दिली आहे. संयुक्त राष्ट्राचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर पश्चिम सीरियामध्ये २२४ इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. तर ३२५ हून अधिक इमारतीची पडझड झाली आहे.
हेही वाचा :