Turkey shakes again: तुर्की पुन्हा हादरली, सलग दुसऱ्या दिवशी ५.५ रिश्टर भूकंपाचे धक्के | पुढारी

Turkey shakes again: तुर्की पुन्हा हादरली, सलग दुसऱ्या दिवशी ५.५ रिश्टर भूकंपाचे धक्के

पुढारी ऑनलाईन : तुर्कीत सोमवारी (दि.) पहाटे झालेल्या शक्तीशाली भूकंपानंतर आज ( दि ७ ) पुन्हा एकदा मध्य तुर्कीत भूकंपाचे धक्के (Turkey shakes again) जाणवले. सकाळी 9.45 च्या सुमारास बसलेल्‍या भूकंपाची नोंद ५.५ रिश्टर स्केल एवढी होती, अशी माहिती अमेरिकेच्या जिओलॉजिकल सर्व्हेच्या वेबसाइटने दिली आहे.

सोमवारी (दि.०७) झालेल्या तीन शक्तीशाली भूकंपानंतर आज पुन्हा एकदा ५.५ रिश्टरचा भूकंप (Turkey shakes again) तुर्कीतील नागरिकांनी अनुभवला. या भूकंपाचे धक्के तुर्कीसह सीरिया, लेबनॉन आणि इस्रायलमध्येही जाणवले. या शक्तीशाली भूकंप साखळीत आत्तापर्यंत 4300 लोकांचा मृत्यू झाला आहे. शेकडो इमारती जमीनदोस्त झाल्याने अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. येथील आपत्ती व्यवस्थापनाकडून मदत आणि बचावकार्य वेगाने सुरू आहे. तरी देखील येथे मृताचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता येथील प्रशासनाकडून व्यख्त केली जात आहे.

Turkey shakes again: शक्तीशाली भूकंपानंतर अनेक धक्के

शक्तीशाली भूकंपानंतर तुर्की आणि सीरियाच्या सीमावर्ती भागात अनेक भूकंपाचे धक्के जाणवले. शक्तीशाली भूकंपानंतर काही तासातच ७.५ रिश्टर स्केलचा दुसरा मोठा भूकंप मध्य तुर्कीत झाला. यानंतर यादिवशी संध्याकाळी सलग तिसरा ६ रिश्टरच्या भूकंप झाला. या साखळी भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात इमारतींचे नुकसान आणि जीवितहानी झाली. सलग भूकंपामुळे बचाव कर्मचारी आणि वाचलेल्या नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे.

हेही वाचा:

Back to top button