भीषण अपघात : परभणीत ट्रकने दुचाकीला उडवले; २ शिक्षक जागीच ठार
मानवत; पुढारी वृत्तसेवा मानवत शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग कल्याण ते निर्मल रस्त्यावर आज (मंगळवार) सकाळी ८:३० वाजण्याच्या सुमारास ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन शिक्षक जागीच ठार झाले. या अपघातात रामेश्वर कदम व गंगाधर राऊळ या दोन शिक्षकांचा समावेश आहे. ते दोघेजण शंकूतलाबाई कांचनराव शाळेत माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत होते.
आज (मंगळवार) शाळेत जाण्यासाठी ते दोघेजण एकाच दुचाकी क्र. MH 22 AH 7031 ने शाळेकडे येत होते. यावेळी पाथरीहून परभणीकडे सिमेंटचे खांब घेऊन भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रक क्रं MH 13 R 3684 ने दुचाकीला जोराची धडक दिली. यात दोघाही शिक्षकांचा जागीच मृत्यू झाला.
येथील ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर शवविच्छेदन केले जाणार आहे. हा अपघात झाल्यानंतर ट्रकचालक जागेवरून फरार झाला आहे. दोन शिक्षकांच्या मृत्यूमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
हेही वाचा :

