Fourth phase Lok Sabha elections | प. बंगालमध्ये पुन्हा हिंसाचार, क्रूड बॉम्ब हल्ल्यात TMC कार्यकर्त्याचा मृत्यू

Fourth phase Lok Sabha elections | प. बंगालमध्ये पुन्हा हिंसाचार, क्रूड बॉम्ब हल्ल्यात TMC कार्यकर्त्याचा मृत्यू
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections 2024) चौथ्या टप्प्यात सोमवारी सकाळी मतदान सुरू झाले. देशातील १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील ९६ जागांसाठी १,७१७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दरम्यान, पश्चिम बंगाल वगळता देशातील अन्य ठिकाणी शांततेत मतदान सुरु आहे. प. बंगालमध्ये क्रूड बॉम्ब हल्ल्यात तृणमूल काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता ठार झाला. चौथ्या टप्प्यातील मतदान सुरू होण्याच्या काही तास आधी बोलपूर लोकसभा मतदारसंघात ही घटना घडली.

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सकाळी ९ वाजेपर्यंत १०.३५ टक्के मतदानाची नोंद झाली. पश्चिम बंगाल सर्वाधिक १५.२४ टक्के मतदान झाले. तर सर्वात कमी मतदान जम्मू- काश्मीरमध्ये ५.०७ टक्के मतदान झाले.

आतापर्यंत २० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील २८३ लोकसभा मतदारसंघात तीन टप्प्यांत मतदान पार पडले आहे. ४ जून रोजी निकाल जाहीर आहे.

दरम्यान, चौथ्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर पं. बंगालमध्ये पुन्हा हिंसाचाराची घटना घडली. पूरबा वर्धमान जिल्ह्यातील बोलपूर येथे अज्ञातांनी त्याच्यावर क्रूड बॉम्ब फेकल्याने त्याचा मृत्यू झाला. मिंटू शेख असे त्याचे नाव आहे. तो रविवारी रात्री उशिरा घरी परतत असताना त्याच्यावर हल्ला झाला. त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे स्थानिकांनी सांगितले.

तृणमूलचा सीपीआय (एम) वर आरोप

या प्रकरणी तृणमूलने त्यांच्या कार्यकर्त्याच्या मृत्यू प्रकरणी सीपीआय (एम) ला जबाबदार धरले आहे. तृणमूलने म्हटले आहे की हिंसाचार आणि रक्तपाताच्या ३४ वर्षाच्या शासनकाळाप्रमाणे सीपीआय (एम) ने केतुग्राममध्ये आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्याची निर्घृण हत्या केली. मिंटू शेख हे निवडणुकीचे काम संपवून घरी जात असताना त्याला अडवले आणि अमानुषपणे हल्ला करून त्याच्यावर बॉम्ब फेकला असल्याचे तृणमूलने म्हटले आहे.

दरम्यान, पश्चिम बंगालमधील दुर्गापूरमध्ये मतदान सुरू असताना भाजप आणि तृणमूल पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. बीरभूममध्ये, भाजपने तृणमूल कार्यकर्त्यांवर मतदान केंद्राबाहेर त्यांच्या स्टॉलची तोडफोड केल्याचा आरोप केला आहे.

 हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news