Pythons Smuggling : एक दोन नव्हे तब्बल ४७ अजगर घेवून आला विमानतळावर आणि पुढे…

Pythons Smuggling : एक दोन नव्हे तब्बल ४७ अजगर घेवून आला विमानतळावर आणि पुढे…
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : तामिळनाडूमधील त्रिची आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी रविवारी (दि.३०) एका प्रवाशाच्या ट्रॉली बॅगमधून ४७ अजगर आणि दोन सरडे जप्त केले. मलेशियाची राजधानी क्वालालंपूरहून आलेल्या या प्रवाशाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मोहम्मद मोईदीन असे त्याचे नाव आहे.

'अशी' केली अजगरांची तस्करी

बाटिक एअरच्या विमानाने क्वालालंपूरहून त्रिची विमानतळावर आल्यानंतर सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी मोईदीनला रोखले. त्याच्या ट्रॉली बॅग पाहून पोलिसांना संशय आला. त्यामुळे अधिका-यांनी तपासणी केली असता बॅगमधील छिद्रित बॉक्समध्ये त्याने विविध जाती आणि आकारांचे अजगर आणि सरडे लपवून ठेवल्याचे आढळून आले. याबाबत माहिती वन विभागाला दिल्यानंतर वन अधिकाऱ्यांनी विमानतळावर पोहोचून ४७ अजगर आणि दोन सरडे जप्त केले. हे प्राणी मलेशियाला परत पाठवण्याची प्रक्रिया वनविभागाने सुरू केली आहे. मोईदीनला चौकशीसाठी पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news