Sachya tarzan murder case : सच्या टारझन खूनप्रकरणातील संशयिताच्या कोठडीत वाढ | पुढारी

Sachya tarzan murder case : सच्या टारझन खूनप्रकरणातील संशयिताच्या कोठडीत वाढ

कुपवाड; पुढारी वृत्तसेवा : खून, खुनाचा प्रयत्न, गोळीबार यासारखे गंभीर गुन्हे असलेला सराईत गुंड सच्या टारझन पांडुरंग जाधव याच्या खूनप्रकरणी अटकेत असलेला गणेश विनोद मोरे (वय 19, रा. अहिल्यानगर, कुपवाड) याला न्न्यायालयाने तीन दिवस पोलिस कोठडी दिली.

गुंड सच्या टारझन सांगलीतील एका खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर बाहेर आला होता. त्याचे कुपवाड अहिल्यानगरमधील एका महिलेशी संबंध होते. तो अधूनमधून त्या महिलेकडे येत होता. रविवारी (दि.23) मध्यरात्री सच्या टारझन त्या महिलेकडे आला होता. सोमवारी (दि.24) पहाटे संबंधित महिला बाहेर गेल्याचे दिसून येताच संशयित गणेश याने धारदार कोयता हातात घेऊन घरात घुसला. सच्या हा झोपेत असताना संशयित मोरे याने सच्या टारझन याच्या डोक्यात कोयत्याने सपासप 24 वार केले. यावेळी स्वतःचा जीव वाचविण्यासाठी हालचाल केली. या हल्ल्यात सच्याच्या उजव्या हाताची बोटे तुटली होती. सच्या रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडल्याचे दिसून येताच गणेश हा दुचाकीवरून कुपवाड पोलिस ठाण्यात हजर झाला होता.

पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात उभे केले होते. त्यावेळी त्याला चार दिवसाची पोलिस कोठडी दिली होती. कोठडीची मुदत संपल्यानंतर आज पोलिसांनी पुन्हा त्याला न्यायालयात उभे केले असता तीन दिवस पोलिस कोठडी दिली. दरम्यान, संशयित गणेश मोरे याचे मोबाईल कॉल डिटेल्स व घटनेच्या दिवशी अहिल्यानगर मधील सीसीटीव्ही फुटेजची माहिती घेऊन पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता सदरचा खून मीच केला आहे, अशी कबुली पोलिसांना दिली आहे.

Back to top button