

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय हवामान खात्याने पुढील तीन तासांसाठी तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये वादळाचा इशारा जारी केला आहे. हवामानशास्त्रज्ञांनी चेन्नई, तिरुवल्लूर, कांचीपुरम आणि चेंगलपट्टी जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी वादळे आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे.
IMD ने सांगितले की, विल्लुपुरम, कुड्डालोर आणि मयुलादुथुराई या जिल्ह्यांसह इतर जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
तामिळनाडूत मुसळधार पावसामुळे शाळा बंद ठेवल्या आहेत. कोईम्बतूरमधील मेट्टुपालयम येथे शुक्रवारी गेल्या २४ तासांमध्ये हंगामातील सर्वात जास्त ३७ सेमी पाऊस पडला. कोईम्बतूरमधील अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक खोळंबली आहे. मुसळधार पावसामुळे रामनाथुपुरमजवळील रस्ता जलमय झाला होता.
हेही वाचा :