

हुपरी; पुढारी वृत्तसेवा: यावर्षी आषाढी एकादशी व बकरी ईदचा सण गुरूवारी (दि.२९) एकाच दिवशी आले आहेत. आषाढी एकादशी असल्याने बकरी ईद असूनही 'कुर्बानी' न देण्याचा कौतुकास्पद निर्णय अनेक गावातील मुस्लिम समाजाने घेतला आहे. या निर्णयामुळे जाती, धर्मातील सलोखा, श्रध्दा व परंपरेचा सन्मान होणार आहे.
यावर्षी २९ जून रोजी आषाढी एकादशी व बकरी ईद सण एकाच दिवशी आले आहेत. बकरी ईद दिवशी मुस्लिम धर्मीय बकऱ्याची कुर्बानी करतात. मात्र, आषाढी एकादशी असल्याने या दिवशी कुर्बानी करणे योग्य नाही. या दिवशी कुर्बानी न देण्याचा निर्णय अनेक गावात घेण्यात आला आहे. गुरुवारी नमाज पठण करुन ईद साजरी करायची. आणि शुक्रवारी कुर्बानी करायची, असा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या गावात असा सामुदायिक निर्णय झाला नाही. तेथील मुस्लिम बांधव गुरूवारी कुर्बानी करणार नाहीत, असा निर्णय त्यांनी वैयक्तिक पातळीवर घेतला आहे. मुस्लिम समाजाचा हा निर्णय बंधुभाव जोपासणारा असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
हेही वाचा