

पुढारी ऑनलाईन डेस्क
देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर करत आहेत. अर्थसंकल्पाच्या सादरीकरणाला सुरुवात होताच शेअर बाजारात कमालीची अस्थिरता दिसून आली. सकाळी 9.15 मिनिटांनी शेअर बाजारातील व्यवहार सुरू होताच सेन्सेक्सने सुमारे 800 अंकांची तर निफ्टीने 175 अंकांची उसळी घेतल्याचे दिसून आले. सुरुवातीच्या एक तासानंतर निफ्टी 17,583 अंकांपर्यंत पोहोचला. तर बँक निफ्टीने 38802 अंकांपर्यत मजल मारली हाेती.
त्यानंतर 11 वाजता बजेटच्या सादरीकरणाला सुरुवात होताच निफ्टी 228 अंकांनी वधारून 17568 अंकांवर व्यवहार करत होता. तर बँक निफ्टी 735 अंकांनी वधारून 38705 अंकांवर व्यवहार करत होता. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी, विविध क्षेत्रातील आर्थिक तरतुदींची माहिती देताना शेअर बाजारात अस्थिरता दिसून आली. 245 अंकावर असणारा निफ्टी 195 तर 770 अंकांवर व्यवहार करणारी बँक निफ्टी 480 अंकांपर्यंत खाली आली.
सध्याची कोरोना परिस्थिती पाहता वर्क फ्रॉम होम, 5जी इंटरनेटआणि इतर बदलत्या तंत्रज्ञानामुळे आयटी क्षेत्रासाठी भरीव आर्थिक तरतूद होण्याची अपेक्षा असल्याने निफ्टी आयटीचा इंडेक्स एक टक्क्यांपेक्षा जास्त वधारला होता. यामध्ये इन्फोसिस, टीसीएस, कॅम्स, एचसीएल टेक यासारखे शेअर्स 2 टक्क्यांपर्यत वधारले होते.
हेही वाचा