अर्थसंकल्प : ‘या’ क्षेत्रातील शेअर्सना होणार फायदा ? | पुढारी

अर्थसंकल्प : 'या' क्षेत्रातील शेअर्सना होणार फायदा ?

पुढारी ऑनलाईन डेस्क

आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडून सर्वच क्षेत्राला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. परिणामी आज सकाळी शेअर बाजार खुला होताच सकारात्मक व्यवहार होताना दिसून आले. सुरवातीलाच सेन्सेक्समध्ये 800 अंकांची तर निफ्टीने 175 अंकांची वाढ झाल्याचे दिसून आले. तर 10.15 वाजण्याच्या सुमारास निफ्टी 17578 अंकांवर व्यवहार करत होता. यावेळी ब्रिटानिया, सन फार्मा, आयसीआयसीआय, कोटक, एचडीएफसी, इन्फोसेस, बजाज फिनसर्व्ह, अदानी, रिलायन्स सारखे दिग्गज शेअर्स 2 ते 4 टक्क्यांनी वधारले होते.

या अर्थसंकल्पातून बाजारातील फार्मा, हेल्थकेअर, मेटल, रेल्वे इन्फ्रा, टेक्सटाईल्स, ऑईल आणि गॅस, हॉस्पिटॅलिटी, रिअल इस्टेट, ॲग्री, इन्श्यूरन्स, क्षेत्राला फायदा होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. त्यामुळे या क्षेत्रातील संबंधीत शेअर्स 2 ते 5 टक्क्यांनी वधारल्याचे दिसून आले.

हेही वाचा

Back to top button