

पुणे : पुढारी वृत्तसेवा
बाणेर बालेवाडी परिसरातून अपहरण झालेला चार वर्षीय मुलगा पुनावळे परिसरात सुखरूप मिळून आला आहे. अपहरणकर्त्याने त्याला तेथेच सोडून पळ काढलाचा अंदाज आहे. मागील आठ दिवसांपासून पुणे पोलीस पिंपरी चिंचवड पोलिसांची पथके मुलाचा शोध घेत होते. पोलिस दलातील अतिवरिष्ठ अधिकारी या घटनेवर जातीने लक्ष ठेवून होते.
पुनावळे येथील क्रिएटिव्ह ऑरचिड या सोसायटीचे सुरक्षा रक्षक दादाराव जाधव (वय ७०) यांच्याकडे आरोपीने मुलाला सोपवले व तेथून पळ काढला. जाधव यांनी मुलाच्या बॅगवरील नंबरवर फोन करून माहिती दिली. त्यानुसाद, वाकड आणि हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुलाला ताब्यात घेतले.
डॉक्टर दाम्पत्याच्या चार वर्षीय मुलाचे 11 जानेवारी रोजी सकाळी दहाच्या सुमारास अपहरण झाले होते. घरासमोर मुलगा खेळत असताना त्याचे अपहरण करण्यात आले होते. हा सर्वप्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मात्र त्याचे अपहरण नेमक्या कोणत्या कारणातून झाले हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.
हे ही वाचलं का ?