Cricket Career : आजच्या दिवशीच अजय जडेजा-मोहम्मद अजहरूद्दीन यांचे करियर आले होते संपुष्टात

Cricket Career : आजच्या दिवशीचं अजय जडेजा-मोहम्मद अजहरूद्दीन यांचे करियर आले होते संपुष्टात
Cricket Career : आजच्या दिवशीचं अजय जडेजा-मोहम्मद अजहरूद्दीन यांचे करियर आले होते संपुष्टात
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : आजच्या दिवशी म्हणजे ३ जून २००० ला मोहम्मद अजहरूद्दीन आणि अजय जेडजा यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय करियरमधील शेवटचा सामना खेळला होता. ढाका येथे पाकिस्तानच्या विरूद्ध झालेला सामना अजहरूद्दीन आणि जडेजा यांच्या आंतरराष्ट्रीय करियरमधील अंतिम सामना ठरला. यानंतर हे दोन्ही खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकले नाहीत. २००० साली आशिया कपमध्ये दोन्ही खेळाडूंनी आपल्या करियरमधील शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. (Cricket Career)

शेवटच्या सामन्यात कशी होती कामगिरी? (Cricket Career

३ जूनला अजय जडेजाने खेळलेल्या शेवटच्या सामन्यात ९३ धावा केल्या होत्या, तर अजहरूद्दी १ धाव करत बाद झाला होता. जडेजाला इमरान नजीर यांने तर अजहरूद्दीनला अब्दुल रज्जाक यांने बाद केले होते. अजय जडेजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जास्त धावा काढल्या नाहीत, पण नव्वदच्या दशकात तो आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जात होता. जडेजाने आपल्या करियरमध्ये १५ टेस्ट सामने खेळले. ज्यामध्ये त्याने ४ शतक ठोकत ५७६ धावा केल्या होत्या. तर १९६ एकदिवसीय सामने खेळले ज्यामध्ये त्याने ५३५९ धावा केल्या. जडेजाची उत्कृष्ट फिल्डर म्हणूनही ओळख होती. (Cricket Career)

मोहम्मद अजहरूद्दीनने आपल्या करियरमध्ये ९९ कसोटी सामने खेळले. ज्यामध्ये त्याने ६३१५ धावा केल्या. कसोटी क्रिकेटमध्ये अजहरूद्दीनच्या नावावर २२ शतक तर २१ अर्धशतक आहेत. अजहरूद्दीनने ३३४ एकदिवसीय सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने ९३७८ धावा केल्या. एकदिवसीय सामन्यांमध्ये अजहरच्या नावावर ७ शतक तर ५८ अर्धशतक आहेत. मोहम्मद अजहरूद्दीनने १९८५ मध्ये इंग्लंडविरोधात आपला पहिला आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळला होता. (Cricket Career)

कोणत्या कारणामुळे आले होते करियर संपुष्टात?

 जडेजा आणि अजहरूद्दीन यांनी पाकिस्तान विरोधात शेवटाचा सामना खेळल्यानंतर सहा महिन्यांनी डिसेंबरमध्ये साऊथ आफ्रिकेचा कर्णधार हैंसी क्रोन्ये यांने मॅच फिक्सिंग बाबत मोठे खुलासे केले होते. ज्यामध्ये अजय जडेजा आणि मोहम्मद अजहरूद्दीन यांच्या नावांचा समावेश होता. याच कारणामुळे अजय जडेजा आणि मोहम्मद अजहरूद्दीन पुन्हा कधीही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकले नाहीत. मॅच फिक्सिंगमध्ये दोन्ही खेळाडूंचे नाव समोर आल्यानंतर बीसीसीआयने दोघांवरही मोठी कारवाई केली होती. कर्णधार मोहम्मद अजहरूद्दीन याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यास आजीवन बंदी घातली होती, तर अजय जडेजा यांच्यावर ५ वर्षोंसाठी बंदी घालण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला होता. (Cricket Career)

हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news