OpenAI ChatGPT : गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा ‘AI’ संदर्भात मोठा इशारा; ‘या’ क्षेत्रांना धोका | पुढारी

OpenAI ChatGPT : गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा 'AI' संदर्भात मोठा इशारा; 'या' क्षेत्रांना धोका

पुढारी ऑनलाईन : गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ( AI ) संदर्भात मोठा इशारा दिला आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स प्रत्येक कंपनीतील प्रत्येक उत्पादनावर प्रभाव पडणार आहे. या नवीन तंत्रज्ञानामुळे लेखन, कॉमर्स इंजनिअर यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रावर प्रामुख्याने प्रभाव पडणार आहे. त्यामुळे समाजाने सध्या नव्याने उपलब्ध झालेल्या तंत्रज्ञानासाठी सज्ज असले पाहिजे, असे  पिचाई (OpenAI ChatGPT) यांनी म्हटले आहे.

पिचाई यांनी CBS या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे. यावेळी ते म्हणाले, “आर्टिफिशिअल इंटेलजन्समुळे मोठ्या प्रमाणावर कामगार कपात होईल. लेखक, अकाऊंटंट, आर्किटेक्ट आणि सॉफ्टवेअर इंजिनिअर अशा विविध क्षेत्रांवर आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा प्रभाव पडेल. हे तंत्रज्ञान संबंधित क्षेत्रातील नोकऱ्यांवर व्यत्यय आणू (OpenAI ChatGPT) शकते.

तुम्ही आजपासून पुढील १० वर्षांचा विचार केलात तर तुमच्यासोबत एक AI तुमचा साथीदार असेल. समजा तुम्ही सकाळी ऑफिसला आलात आणि तुमच्याकडे शंभर गोष्टी आहेत, ज्या तुम्हाला करायच्या आहेत.  यामधील अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्या तुम्हाला पहिल्या करणे गरजेचे आहे हे देखील AI (OpenAI ChatGPT) तुम्हाला सांगेल, असेही पिचाई यांनी या वेळी स्पष्ट केले.

OpenAI ChatGPT : अनेकांनी केली ChatGPT बंद करण्याची मागणी

AI संदर्भात पसरवलेली चुकीची आणि खोट्या माहिती आणि  बातम्यांमुळे होणारे संभाव्य नुकसान देखील सुंदर पिचाई यांनी हायलाइट केले आहेत. आगामी काळात ही मोठी समस्या बनेल, अशी देखील शक्यता त्यांनी वर्तवली आहे. पिचाई यांनी गेल्या महिन्यात गुगल कर्मचार्‍यांना कंपनीच्या स्वतःच्या एआय बॉट बार्डशी संबंधित जोखमींबद्दल चेतावणी दिली होती. ChatGPT सारख्या AI तंत्रज्ञानावर गेल्या काही काळापासून चर्चा सुरू आहे. इलॉन मस्क, स्टीव्ह वोझ्नियाक आणि अनेक संशोधकांनीही ते थांबविण्‍यात यावे, अशी विनंती केली आहे.

हेही वाचा :

Back to top button