Google ची सेवा डाउन! Gmail, यूट्यूब, ड्राइव्ह ओपन करताना यूजर्संना अडचणी | पुढारी

Google ची सेवा डाउन! Gmail, यूट्यूब, ड्राइव्ह ओपन करताना यूजर्संना अडचणी

पुढारी ऑनलाईन डेस्क : गुगलची सेवा गुरुवारी (दि.२३) डाउन झाली. यामुळे यूजर्संना Gmail, यूट्यूब, ड्राइव्हशी संबंधित सेवा मिळवताना अडचणी आल्या. टेक आउटेजची तक्रार करण्यासाठी एक ऑनलाइन टूल असलेल्या डाउनडिटेक्टरच्या मते, गुगल आउटेजच्या भारतात १.५०० पेक्षा जास्त तक्रारी आल्या आहेत. यूजर्संनी आउटेजबद्दल त्यांची नाराजी ट्विटरवर मीम्सच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. हे मीम्स व्हायरल झाले आहेत.

YouTube, Drive, Gmail, Duo, Meet, Hangouts, Docs, Sheets सारखे Google चे अॅप्स आणि वेबसाइट्सदेखील डाउन झाल्याची नोंद करण्यात आली आहे. Downdetector च्या मते, यूजर्संनी Gmail बाबत सुमारे २ हजार तक्रारी केल्या आहेत. Twitter वर यूजर्संनी त्यांच्या Gmail साइन इन पेजवर ५०२ एरर दर्शविणारे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. 502 एररचा अर्थ सर्व्हर प्रतिसाद देत नाही असा होतो.

हे ही वाचा :

Back to top button