भारतीय संघाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिन्ही फॉरमॅटची जर्सी दिसत आहे. टेस्ट क्रिकेटसाठी पाढऱ्या रंदाची जर्सी असून निळ्या रंगात भारताचे नाव असणार आहे. शिवाय खांद्यावर दोन्ही बाजूला निळ्या रंगाच्या पट्ट्या असणार आहेत. छातीवर डाव्या बाजूला निळ्या रंगाच्या पट्ट्या आहेत. ज्या खालून वरती वाढत जात आहेत. तर एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटसाठी निळ्या रंगाची जर्सी आहे. यातील एका फॉरमॅटसाठी गडद निळ्या रंगाची तर दुसरी फिक्कट रंगाची आहे. दरम्यान, यापैकी वन डे साठी कोणती आणि टी २० कोणती हे अद्याप सांगण्यात आलेले नाही. (Team India New Jersey Video).