Grammys Taylor Swift : ‘ग्रॅमी’मध्ये युनिक लूकमध्ये दिसली टेलर स्विफ्ट (Photos)

Taylor Swift
Taylor Swift
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : टेलर स्विफ्ट प्रसिद्ध गायिका जी यावेळी जगभरात सर्वात हॉट गायिकांपैकी एक आहे. ती नेहमी आपल्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेते. (Grammys Taylor Swift ) ती कोणतीही पार्टी असो किंवा इवेंट असो वा रेड कार्पेट, ही दिवा नेहमीच आपल्या बेस्ट पेहराव्याने सर्वांना घायाळ करते. टेलर स्विफ्ट ग्रॅमी २०२४ च्या समारंभात रेड कार्पेटवर पोहोचली. तिच्या पांढऱ्या वनपीस गाऊनने सर्वांच्या नजरा तिच्याकडे वळल्या. (Grammys Taylor Swift)

संबंधित बातम्या –

कसा होता टेलरचा लूक

टेलर स्विफ्टच्या लूकने सर्व कॅमेऱ्यांच्या नजरा आपल्याकडे वळवल्या. आयकॉनिक व्हाईट गाउन तिने परिधान केला होता. सेलेना गोमेजच्या बीएफएफ या फॅशन स्टेटमेंटने लोकांचे लक्ष केंद्रीत केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Silver (@silverperidot)

प्रसिद्ध लव्ह स्टोरी फेम गायिका या लूकमध्ये खूप सुंदर दिसत होती. स्विफ्टने आपल्या लूकमध्ये घड्याळ, सोबत एक हिरा आणि क्रिस्टल-जडित काळा चोकर देखील घातला होता. गोल्डन ओपन हेअर, काळ्या रंगाचे आयलायनर, हायलायटर आणि चमकदार आयशॅडोसोबत एक ग्लॅमरस मेकअप लूक केला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news