PAK vs AUS : सेमिफायनलमध्‍ये पाकिस्‍तानविरोधात ऑस्‍ट्रेलिया आतापर्यंत अजिंक्‍यच

PAK vs AUS : सेमिफायनलमध्‍ये पाकिस्‍तानविरोधात ऑस्‍ट्रेलिया आतापर्यंत अजिंक्‍यच
Published on
Updated on

टी -20 वर्ल्डकप आता अंतिम टप्‍प्‍यात आला आहे. बुधवारी इंग्‍लंडचा पराभव करत न्‍यूझीलंडच्‍या संघाने आपलं फायनलचे तिकिट पक्‍के केले. आज दुसर्‍या सेमिफायनलमध्‍ये ऑस्‍ट्रेलियाचा संघ पाकिस्‍तानशी ( PAK vs AUS ) दोन हात करणार आहे.

पाकिस्‍तान संघ पाचवेळा तर ऑस्‍ट्रेलियाचे संघाने चारवेळा सेमिफायनलमध्‍ये धडक मारली आहे. वर्ल्डकप स्‍पर्धेतील साखळी सामन्‍यांचा विचार करता दोन्‍ही संघ आतापर्यंत सहावेळा आमने-सामने आले आहेत. यातील तीन सामने पाकिस्‍तानने तर तीन ऑस्‍ट्रेलियाने जिंकले आहेत. मात्र एक विक्रम आजही आस्‍ट्रेलियाच्‍या नावावर कायम आहे.

( PAK vs AUS )  ऑस्‍ट्रेलिया विक्रम अबाधित ठेवण्‍यासाठी प्रयत्‍न करणार

आजपर्यंतच्‍या वर्ल्डकप स्‍पर्धेतील सेमिफायनलमध्‍ये ऑस्‍ट्रेलियाविरोधात पाकिस्‍तानचा संघ नेहमी पराभूतच झाला आहे. पाकिस्‍तानविरोधातील सेमिफायनलच्‍या सामन्‍यात ऑस्‍ट्रेलियाच्‍या संघ आजपर्यंत अजिंक्‍यच राहिला आहे. ॲरोन फिंचच्‍या नेतृत्‍वाखाली आज मैदानात उतरणार्‍या ऑस्‍ट्रेलियाचा संघ हा विक्रम अबाधित ठेवण्‍यासाठी प्रयत्‍न करेल.

( PAK vs AUS )दुबईचे मैदान पाकिस्‍तानसाठी लकी

यंदाच्‍या टी -20 वर्ल्डकप स्‍पर्धेत पाकिस्‍तानच्‍या संघाला चांगला सूर गवसला आहे. सर्व साखळी सामने या संघाने जिंकले आहेत. तर साखळीसामन्‍यांमध्‍ये ऑस्‍ट्रेलियाचा इंग्‍लंडने पराभव केला होता. तसेच पाकिस्‍तान संघाने दुबईच्‍या मैदानावरील मागील १५ सामन्‍यांमध्‍ये विजय मिळवला आहे. हाच विक्रम कायम ठेवण्‍यासाठी पाकिस्‍तानचा संघ  प्रयत्‍नशील असेल.

ऑस्‍ट्रेलियासमोर असणार मोठे आव्‍हान

डेव्‍हिड वॉर्नरला पुन्‍हा एकदा फॉर्म गवसल्‍यामुळे ऑस्‍ट्रेलियाचा संघ मजबूत आहे. वॉर्नर याने या स्‍पर्धेत आतापर्यंत १८७ धावा केल्‍या आहेत. त्‍याचबरोबर मिचेल मार्श याचीही फलंदाजी बहरली आहे. तर या स्‍पर्धेत पाकिस्‍तानचा कर्णधार बाबर आजम याच्‍या नावावर २६४ धावा आहेत. या स्‍पर्धेत ताे सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. मोहम्‍मद रिझवान यालाही सूर सापडला आहे. यामुळे दोघांमुळे  पाकिस्‍तानचे पारडे जड असल्‍याचे मानले जात आहे. त्‍यामुळेच आज ऑस्‍ट्रेलियासमोर मोठे आव्‍हान असेल असे मानले जात आहे.

नाणेफेक ठरणार महत्त्‍वपूर्ण

यंदाच्‍या टी -20 वर्ल्डकप स्‍पर्धेत नाणेफेक हाच विनिंग फॅक्‍टर ठरला आहे. आजही नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी घेण्‍याची शक्‍यता आहे. या मैदानावर धावांचा पाढलाग करणार्‍या संघाने ११ पैकी १० सामने जिंकले आहेत. त्‍यामुळे आजही नाणेफेक महत्‍वपूर्ण ठरणार आहे.

हेही वाचलं का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news