हृतिक रोशनच्या गर्लफ्रेंडसाठी पहिली बायको सुझान खानचे काय पण ! गर्लफ्रेंडची कळी खुलली

हृतिक रोशनच्या गर्लफ्रेंडसाठी पहिली बायको सुझान खानचे काय पण ! गर्लफ्रेंडची कळी खुलली
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता हृतिक रोशनची (hrithik roshan) पूर्व पत्नी सुझेन खानने (Sussanne Khan) हृतिकची कथित गर्लफ्रेंड सिंगर, अभिनेत्री सबा आजादसाठी आपल्या इन्स्टाग्रामला स्टोरी शेअर करत तिची स्तुती केली आहे. आणि सबा आजादनेही या  स्टोरीला रिप्लाय दिला आहे. (Saba Azad)

(Saba Azad) बॉलिवूडचा 'ग्रीक गॉड' म्हणून ओळखला जाणारा हृतिक रोशन (hrithik roshan) नेहमी आपल्या वैयक्तिक गोष्टीमुळे सोशल मीडियावर चर्चेत असतो. हृतिक रोशन आणि सुझेनचा काडीमोड झाल्यावरही ते दोघेही खूप चर्चेत आले होते. काही दिवसांपूर्वी  हृतिक आणि सबा आजाद (Saba Azad) हातात-हात पकडून पापाराझींना समोर आल्याने त्यांच्या नात्याबद्दल फिल्म इंडस्ट्रीमध्ये अफवा सुरू झाल्या होत्या. दरम्यान सुझेनने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीला एक पोस्ट करत तिची स्तुती केली आहे. आणि सबा आजादनेही या  स्टोरीला रिप्लाय दिला आहे. त्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sussanne Khan (@suzkr)

Saba Azad-काय होती पोस्ट?

सुझेन केलेल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये सबा सिंगींग फरफॉर्रमन्स देतानाचा फोटो आहे. व तिने या फोटोवर सबाला (Saba Azad) टॅग करत लिहले आहे की, 'खुपचं कमाल ही संध्याकाळ होती, तु सुपर कूल आणि टॅलेंटेड आहेस' थोड्याच वेळात सबानेही सुझेनच्या इंस्टा स्टोरीला रिप्लाय दिला आहे. की, थॅंक्यू… मेरी सुजी . काल तुम्ही होता त्यामूळे मी यावेळी खूप खूश होते. सुझेनची स्तुती आणि सबाचा रिप्लायची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यामूळे त्यांच्या फॅन्सच्या संमिश्र कॉमेंट येत आहेत.

Saba Azad – कोण आहे सबा?

हृतिकसोबत असलेल्या कथित अफेअरमूळे सबा चर्चेत आली आहे. तिने अनेक गाण्यांसाठी आवाज दिला आहे. तिने काही जाहीरांतीमध्येही अभिनय केला आहे. कॅडबरी, पाउंडस, किट-कॅट, वोडाफोन, सनसिल्क, येअरटेल आदींचा यात समावेश करता येईल.  'रॉकेट बॉयज'  या वेब सीरिजमध्येही तिने  अभिनय केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saba Azad (@sabazad)

हे ही वाचलंत का ?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news