Surya on Virat : मानले तुला भाऊ…; सूर्यकुमारने केली कौतुकाची परतफेड

Surya on Virat : मानले तुला भाऊ…; सूर्यकुमारने केली कौतुकाची परतफेड
Published on
Updated on

मुंबई (वृत्तसंस्था) : स्लो स्ट्राईक रेटच्या खेळी करतो, अशी टीका होत असतानाच विराट कोहलीने 63 चेंडूंत शतकी खेळी करत सर्वांची तोंडे बंद केली. विराट कोहलीने आयपीएलमधील आपले सहावे शतक ठोकले. या शतकामुळे आरसीबीचे प्ले-ऑफचे स्वप्न जिवंत राहिले. आरसीबीने सनरायजर्स हैदराबादचे 187 धावांचे आव्हान 4 चेंडू राखून पार केले. विराट कोहलीच्या या सामना जिंकून देणार्‍या शतकी खेळीचे सर्वजण कौतुक करत आहेत. विराट कोहलीच्या फॅन्सप्रमाणे सूर्यकुमार यादवनेही विराट कोहलीच्या शतकी खेळीचे तोंडभरून कौतुक केले आहे. (Surya on Virat)

मुंबई इंडियन्सचा फलंदाज सूर्यकुमार यादवने काही दिवसांपूर्वी शतकी खेळी केली होती. याचे विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर स्टोरी ठेवत कौतुक केले होते. आता सूर्यकुमार यादवने देखील त्याच स्टाईलमध्ये विराट कोहलीने शतक केल्यावर त्याचे कौतुक केले. सूर्यकुमार यादवने विराट कोहलीचा शतक सेलिब्रेट करतानाचा फोटो शेअर करत त्याला 'मानले रे भाऊ…' असे कॅप्शन दिले. (Surya on Virat)

विशेष म्हणजे सूर्यकुमार यादवने शतक ठोकल्यानंतर आरसीबीने देखील त्याचे कौतुक केले होते. सूर्यकुमार यादवने गुजरात टायटन्सविरुद्ध शतकी धमाका केला होता. आरसीबी विरुद्ध एसआरएच सामन्यात प्रथम फलंदाजी करणार्‍या हैदराबादने आरसीबीसमोर विजयासाठी 187 धावांचे आव्हान ठेवले होते. हेन्रीच क्लासेनने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत 51 चेंडूंत 104 धावांची शतकी खेळी केली, पण विराटच्या शतकाने क्लासेनच्या शतकाचे चीज झाले नाही.

हेही वाचा; 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news