सुरेश रैनाची क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती

सुरेश रैनाची क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती
Published on
Updated on

पुढारी डेस्क : भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज सुरेश रैना याने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. माझ्या देशाचे आणि माझे राज्य उत्तर प्रदेशचे प्रतिनिधित्व करणे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मी क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर करू इच्छितो, असे सुरेश रैना याने ट्विट करत म्हटले आहे.

तुम्ही मला जो पाठिंबा दिला आणि माझ्या क्षमतेवर जो अतूट विश्वास दाखवला त्याबद्दल मी बीसीसीआय, यूपीसीए क्रिकेट. चेन्नई आयपीएल, राजीव शुक्ला आणि सर्व चाहत्यांचे आभार मानतो, असे रैनाने ट्विटमध्ये नमूद केले आहे.

रैना २००८ पासून इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये चेन्नई संघाशी जोडला गेला आहे. एमएस धोनी याचा तो सर्वात लाडका असा खेळाडू म्हणून ओळखला जातो. त्याने दमदार फलंदाजी करत चेन्नईला अनेकवेळा विजय मिळवून दिला आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये तो अनसोल्ड ठरला होता. त्याने आता क्रिकेटला अलविदा केले आहे. त्याने स्थानिक क्रिकेटमधून संन्यास घेतला आहे. आता तो आयपीएलमध्येही खेळणार नाही. तो बीसीसीआयशी संबंधित कोणत्याही स्पर्धेत सहभागी होणार नाही. त्याने १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. रैना गेल्या काही दिवसांत गाजियाबादच्या आरपीएल क्रिकेट स्टेडियममध्ये सराव करताना दिसला होता.

रैनाच्या करिअरचा विचार केला तर २२६ एकदिवसीय सामन्यांतील १९४ डावांत त्याने ३५.३१ च्या सरासरीने ५,६१५ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर ५ शतके आणि ३६ अर्धशतके आहेत. एकदिवसीय सामन्यात त्याची सर्वोत्तम खेळी ११६ धावांची आहे. आंतरराष्ट्रीय टी20 मधील ७८ सामन्यांत ६६ डावांत त्याने २९.१६ च्या सरासरीने १,६०४ धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट १३४.७९ एवढा राहिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news