

पुढारी ऑनलाईन डेस्क : अलाहाबाद हायकोर्टाने चित्रपट आदिपुरुषचे दिग्दर्शक ओम राऊत, निर्माता भूषण कुमार, संवाद लेखक मनोज मुंतशिर यांना २७ जुलै रोजी कोर्टाने हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. (Film Adipurush) सुप्रीम कोर्टाने अलाहाबाद हायकोर्टाच्या आदेशावर स्थगिती दिली आहे. चित्रपट निर्माता, दिग्दर्शक आणि संवाद लेखक यांना वैयक्तिकपणे हजर राहण्यास सांगितले होते. सुप्रीम कोर्टाने चित्रपटाविरोधात दुसऱ्या हायकोर्टात प्रलंबित प्रकरणांवरही स्थगिती दिलीय. (Film Adipurush)
चित्रपटाच्या निर्मात्यांविरुद्ध विविध उच्च न्यायालयांसमोर प्रलंबित असलेल्या कार्यवाहीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध चित्रपटाच्या निर्मात्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना २७ जुलै रोजी हजर राहण्यास सांगितले आहे.
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर अलाहाबादच्या हायकोर्टामध्ये आदिपुरुष विरोधात सर्व सुनावणीच्या कार्यवाहीवर स्थगिती दिली जाईल.
अलाहाबाद हायकोर्टामध्ये दाखल झालेल्या याचिकांमध्ये धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली होती. सुप्रीम कोर्टामध्ये या चित्रपटाचे CBFC सर्टिफिकेट रद्द करण्याचीही मागणीची याचिका दाखल करण्यात आली होती.