Kalki Teaser : प्रभासचा ‘प्रोजेक्ट के’ नव्हे तर ‘कल्की’ नाव ठरलं | पुढारी

Kalki Teaser : प्रभासचा 'प्रोजेक्ट के' नव्हे तर 'कल्की' नाव ठरलं

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथ सुपरस्टार प्रभासच्या आगामी ‘प्रोजेक्ट के’ या चित्रपटाचे शीर्षक समोर आले आहे. यूएस मध्ये चालू असलेल्या सॅन दिएगो कॉमिक-कॉन (SDCC) मध्ये मोठ्या धूमधडाक्यात या चित्रपटाच्या अधिकृत शीर्षकाची घोषणा करण्यात आली. या चित्रपटाचे अधिकृत नाव ‘कल्की 2898 एडी’ असे करण्यात आले आहे. (Kalki Teaser) टीझर रिलीज करण्यासोबतच ‘प्रोजेक्ट के’ ची बहुप्रतीक्षित झलकही दाखवण्यात आली. शुक्रवारी सकाळी भारतातही टीझर रिलीज करण्यात आला आहे. प्रभास, कमल हासन आणि दिग्दर्शक नाग अश्विन यांच्या उपस्थितीत कॉमिक कॉन येथे चित्रपटाचे शीर्षक आणि टीझरचे अनावरण करण्यात आले. (Kalki Teaser)

कल्की 2898 एडी चा टीझर

नाग अश्विन दिग्दर्शित आणि वैजयंती मूव्हीज निर्मित हा चित्रपट आहे. टीझरमध्ये असे म्हटले आहे की, ‘जेव्हा अंधार जगाला व्यापतो, तेव्हा एक नायक उदयास येतो.’

प्रकाश अंधारावर विजय मिळवेल

टीझर व्हिडिओमध्ये काही ओळी देखील दिसल्या आहेत, ज्यामध्ये लिहिले आहे की, ‘जेव्हा अंधार जग व्यापेल, तेव्हा एक शक्ती निर्माण होईल. शेवट आता सुरू होतो.’ झलकमध्ये, सैन्यात भरती झालेल्या दीपिकाचे पात्र भावनिक गोंधळात अडकलेले दिसते. तर प्रभासची व्यक्तिरेखा एका शूर योद्धाच्या भूमिकेत दिसत आहे, जो आपल्या जगाला वाचवण्यासाठी प्रसंगी सरसावतो.

टीझरमध्ये अमिताभ बच्चन यांची व्यक्तिरेखा एका भयंकर, पट्टीने बांधलेला योद्धा दिसत आहे. एका ठिकाणी एक पात्र ‘प्रोजेक्ट के म्हणजे काय?’ मग त्याचे नाव ‘कल्की 2898 AD’ असे घोषित केले जाते. हा चित्रपट १२ जानेवारी, २०२४ रोजी भारतात आणि जगभरात तेलुगू, हिंदी, तमिळ, मल्याळम, कन्नड आणि इंग्रजी भाषांमध्ये प्रदर्शित होईल. त्याचवेळी, चाहत्यांसह निर्माते आणि समीक्षकांना ‘कल्की 2898 एडी’ कडून मोठ्या अपेक्षा आहेत, जो २०२४ च्या सर्वात मोठ्या रिलीजपैकी एक आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prabhas (@actorprabhas)

Back to top button