सनी लिओनी लाल साडीत बास्‍केटबॉल खेळण्यात दंग ! व्हायरल व्हिडिओने चाहते घायाळ

सनी लिओनी लाल साडीत बास्‍केटबॉल खेळण्यात दंग ! व्हायरल व्हिडिओने चाहते घायाळ
Published on
Updated on

नवी दिल्‍ली ; पुढारी ऑनलाईन

अभिनेत्री सनी लिओनीचा एक व्हिडीओ सध्‍या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्‍ये ती लाल साडीत पती डेनियल वेबरसोबत बास्‍केटबॉल खेळत असल्‍याचे दिसून येत आहे.

सनी लिओनीचा हा व्हिडिओ खूपच मजेशीर आहे. या व्हिडिओत सनी डेनियल वेबरकडून बास्‍केटबॉल हिसकावून घेण्याचा प्रयत्‍न करत आहे. मात्र तो सनीला सहजरीत्‍या चकवा देण्यात यशस्‍वी होतो. अशा पध्दतीने हे पती-पत्‍नी निवांत क्षणांचा आनंद घेत असल्‍याचे दिसून येत आहे. यात लक्ष वेधून घेणारी गोष्‍ट म्‍हणजे सनी लिओनीने लाल रंगातली साडी परिधान केली आहे. मात्र साडी परिधान करून देखील मोठ्या लकबीने ती पती डॅनियलसोबत बास्‍केटबॉल खेळत आहे. बॉल बास्‍केटमध्ये टाकण्सा‍याठी दोघांमध्ये चांगलीच चढाओढ लागल्‍याचे या व्हिडिओत दिसून येत आहे.

सनी लिओनीने पती डेनियल वेबससोबत बास्‍केटबॉल खेळतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्‍ट केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये 'आपल्‍या खास मित्राला टॅग करा. सनी लियोनी' असे एकदम सिंम्‍पल कॅप्शन दिले आहे. या व्हिडिओला चाहत्‍यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. चाहत्‍यांकडून या व्हिडिओला लाइक्‍स केले जात असून, यावर मोठ्या प्रमाणात कमेंट्स देखील करत आहेत.

सनी लिओनी ने २०११ मध्ये बिग बॉसमध्ये एन्ट्री केली. यानंतर तीच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली. यानंतर तिला बॉलीवूडमधून चित्रपटाच्या ऑफर मिळाल्‍या. 'जिस्म 2' मधून तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. 'रागिनी एमएमएस २' मध्येही ती दिसली होती. सध्या ती दाक्षिणात्‍य चित्रपटांच्या चित्रिकरणात व्यस्‍त आहे. नुकतीच ती ॲक्‍शन सीरीज अनामिका मध्ये दिसून आली होती. ज्‍यातील .ितिचा ॲक्‍शन अंदाज चाहत्‍यांना आवडला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news