

पुढारी ऑनलाईन डेस्क : पुणे शहरात आगीच्या घटनांचे सत्र सुरूच आहे. आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास शहरातील रास्ता पेठ परिसरातील ताराचंद रुग्णालयातील विद्यार्थिनींच्या वसतिगृहात आग लागल्याची घटना घडली. या घटनेत विद्यार्थिनींचे शैक्षणिक आणि इतर साहित्य जळून खाक झाले. मात्र या घटनेत जीवितहानी झाली नाही. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. वस्तीगृहातील पहिल्या मजल्यावरील खोली क्रमांक चारमध्ये आग लागली होती.
अधिक माहिती अशी की, वसतिगृहाची इमारत चार मजल्यांची असून सकाळी नऊ वाजण्याचा सुमारास पहिल्या मजल्यावरील खोली क्रमांक ४ मध्ये आग लागली होती. तात्काळ अग्निशमन मुख्यालय आणि कसबा अग्निशमन केंद्र येथून अग्निशमन वाहने दाखल झाली. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचताच त्यांनी प्रथम मुलींना सुरक्षित बाहेर काढून इमारतीमध्ये आणखी कोण आहे का याची खात्री केली. यानंतर जवानांनी खोलीत पाणी मारून दहा मिनिटांत आग आटोक्यात आणली. या घटनेत शैक्षणिक साहित्य, लाकडी सामान आणि वस्तू जाळून खाक झाल्या होत्या.
महाड औद्योगिक वसाहतीच्या अतिरिक्त क्षेत्रामध्ये असलेल्या ब्ल्यू जेट या कंपनीमध्ये सकाळी पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास स्पोट झाला. यामध्ये कोणीही जखमी अथवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र काही कामगार अडकल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. या ठिकाणी मोठी आग लागली आहे. मात्र येथे सुरू असलेल्या आगीच्या व स्फोटाच्या ठिकाणी वायू गळतीच्या शक्यतेने प्रत्यक्ष घटनास्थळी जाण्यात अग्निशमन दलाला संबंधित शासकीय यंत्रणांना आगीवर नियंत्रण मिळवण्यास विलंब होत असल्याचे सांगण्यात आले आहे.
हेही वाचा