Stock Market Updates | सेन्सेक्स सपाट, निफ्टी १८,४०० च्या खाली, जाणून घ्या बाजाराची आजची दिशा

Stock Market Updates | सेन्सेक्स सपाट, निफ्टी १८,४०० च्या खाली, जाणून घ्या बाजाराची आजची दिशा

Published on

पुढारी ऑनलाईन : आशियाई बाजारात आज संमिश्र वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर आज भारतीय शेअर बाजार सपाट झाला. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स सुमारे १०० अंकांनी घसरून ६२,२३० वर आला. तर निफ्टी (Nifty) २४ अंकांच्या घसरणीसह १८,३७४ वर होता. सेन्सेक्सवर (Sensex) एचडीएफसी आणि एचडीएफसी बँक हे टॉप लूजर होते. हे शेअर्स १ ते २ टक्क्यांपर्यंत घसरले. मारुती, एम अँड एम, इंडसइंड बँक, कोटक बँक आणि ॲक्सिस बँक हेदेखील घसरले आहेत. तर सन फार्मा, एशियन पेंट्स, इन्फोसिस, विप्रो आणि नेस्ले हे शेअर्स वाढले आहेत. (Stock Market Updates)

सुरुवातीच्या ट्रेडिंगमध्ये Nifty PSU Bank सुमारे १ टक्के वाढला. तर निफ्टी फार्मा ०.९३ टक्के वाढला होता. FMCG, आयटी, मेटल, रियल्टी, हेल्थकेअर आणि consumer durables, ऑइल आणि गॅस हे क्षेत्रीय निर्देशांकही वधारले आहेत.

रुपया मजबूत

सुरुवातीच्या व्यवहारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया ११ पैशांनी वाढून ८२.२० वर पोहोचला. डॉलर इंडेक्समध्ये घसरण आणि अपेक्षेपेक्षा कमी व्यापार तूट यामुळे रुपयाला मदत झाली आहे.

अमेरिकेतील बाजारात तेजी

अमेरिकेतील शेअर बाजारांनी सोमवारी उच्च पातळीवर व्यवहार केला. Dow Jones Industrial Average निर्देशांकांची सहा सत्रांमध्ये तेजी कायम आहे. हा निर्देशांक ०.१ टक्के वाढून बंद झाला. एस अँड पी ५०० ०.४ टक्के आणि नॅस्डॅक कंपोझिट ०.७ टक्के वाढला.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news