Stock Market Updates | प्रॉफिट बुकिंगमुळे सेन्सेक्स-निफ्टी लाल चिन्हात! बँकिंग स्टॉक्समध्ये घसरण

Stock Market Updates | प्रॉफिट बुकिंगमुळे सेन्सेक्स-निफ्टी लाल चिन्हात! बँकिंग स्टॉक्समध्ये घसरण
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : बँकिंग स्टॉक्समधील कमकुवत स्थिती आणि फेडरल रिझर्व्हकडून लवकर व्याजदरात कपात होणार नसल्याचे संकेत यामुळे आज गुरुवारी (दि. २२) सुरुवातीच्या व्यवहारात इक्विटी बेंचमार्क सेन्सेक्स आणि निफ्टी घसरले. बाजारात आजही प्रॉफिट बुकिंग दिसून आले. आज सकाळी ११ च्या सुमारास सेन्सेक्सची ५०० अंकांनी घसरून ७२,२०० च्या खाली आला. तर निफ्टी २२ हजारांच्या खाली आला होता. (Stock Market Updates)

सेन्सेक्स ७२,६७७ वर खुला झाला. त्यानंतर तो ७२,२०० पर्यंत खाली आला. सेन्सेक्सवर भारती एअरटेल, टायटन, एचडीएफसी बँक, पॉवर ग्रिड, कोटक बँक, एशियन पेंट्स, बजाज फायनान्स, इंडसइंड बँक, एनटीपीसी, अल्ट्राटेक सिमेंट, हिंदुस्तान युनिलिव्हर हे शेअर्स घसरले. तर एचसीएल टेक, ॲक्सिस बँक, विप्रो, टाटा स्टील, टीसीएस हे शेअर्स वाढले.

निफ्टीवर भारती एअरटेल, बीपीसीएल, टायटन, एचडीएफसी बँक, एशियन पेंट्स हे टॉप लूजर्स आहेत. तर आयशर मोटर्स, एचसीएल टेक, अॅक्सिस बँक, हिंदाल्को हे शेअर्स तेजीत आहेत. निफ्टी बँक, निफ्टी फायनान्सियस सर्व्हिसेस सुमारे १ टक्क्यांनी घसरले आहेत.

यूएस फेडरल रिझर्व्हच्या फेब्रुवारीच्या बैठकीतील इतिवृत्तातून सूचित केले आहे की व्याजदरात कपात करण्याची घाई केली जाणार नाही. आज सकाळी आशिया-पॅसिफिकमधील बाजारातही तेजी दिसून आली. जपानच्या निक्केई २२५ निर्देशांकाने ३९ हजारांवर जात नवा विक्रम नोंदवला. (Stock Market Updates)

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news