Stock Market : भारतीय शेअर बाजारात तेजी कायम

Stock Market : भारतीय शेअर बाजारात तेजी कायम
Published on
Updated on

Stock Market : आज मंगळवारी (दि.२५) शेअर बाजाराचा सेन्सेक्स आणि निफ्टी तेजीत खुला झाला आहे. सेन्सेक्स १७१ अंकांनी तर निफ्टी २० अंकांनी वाढून खुला झाला आहे. दरम्यान, आज सुरुवातीच्या व्यवहारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया २५ पैशांनी वाढून ८२.६३ वर पोहोचला. गुंतवणूकदारांना लागून राहिलेली अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या दरवाढीची धास्ती तसेच आशियातून मिळत असलेल्या कमकुवत संकेताच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजाराला दिशा मिळण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.

सोमवारी लक्ष्मीपूजनला झालेल्या एक तासाच्या विशेष 'मुहूर्त' ट्रेडिंग सत्रात भारतीय इक्विटी निर्देशांक ‍वधारले होते. बीएसई आणि एनएसईवर संध्याकाळी ६.१५ ते ७.१५ दरम्यान ट्रेडिंग झाले. या सत्रात सेन्सेक्स ५२५ अंकांनी म्हणजेच ०.८८ टक्क्यांनी वाढून ५९,८३२ वर बंद झाला, तर निफ्टी १५४ अंकांनी म्हणजेच ०.८८ टक्क्यांनी वाढून १७,७३१ वर स्थिरावला. विशेष एक तासाच्या ट्रेडिंग सत्रानंतर गुंतवणूकदारांना २.१ लाख कोटींचा फायदा झाला.

निफ्टी मिडकॅप ०.५० टक्‍क्‍यांनी व स्‍मॉलकॅप ०.९३ टक्‍क्‍यांनी वाढल्याने मिड-आणि स्‍माल-कॅप समभागांनी उच्चांक गाठला. बीएसईवर २,६५९ शेअर्स ‍वधारले तर ७४७ शेअर्समध्ये घसरण झाली. BSE-सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल (m-cap) वाढून २७६.५२ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. आयसीआयसीआय बँक, नेस्ले आदींचे शेअर्स टॉप गेनर्स ठरले. (Stock Market)

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news