Stock Market Crash | ब्लडबाथ! सेन्सेक्स ८५० अंकांनी कोसळला, IT स्टॉक्सची दाणादाण

Stock Market Crash | ब्लडबाथ! सेन्सेक्स ८५० अंकांनी कोसळला, IT स्टॉक्सची दाणादाण
Published on
Updated on

[web_stories title="true" excerpt="false" author="false" date="false" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="10" order="DESC" orderby="post_date" view="circles" /]

Stock Market Crash : जागतिक कमकुवत संकेतांमुळे आज सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशीच भारतीय शेअर बाजार कोसळला. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स तब्बल सुमारे ८५० अंकांनी घसरून ५९,५८० पर्यंत खाली आला. तर निफ्टी २१४ अंकांनी घसरून १७,६१३ वर आला. त्यानंतर सेन्सेक्स ९५० अंकांनी खाली आला होता. मुख्यतः IT स्टॉक्स गडगडले आहेत. आयटीमध्ये इन्फोसिस १२ टक्के, LTIMindtree, Persistent Systems प्रत्येकी ८ टक्क्यांनी घसरले. टेक महिंद्रा, एल अँड टी टेक्नॉलॉजी ७.३० टक्के, एचसीएल टेक्नॉलॉजीचा शेअर ५ टक्क्यांनी खाली आला.

आघाडीच्या दोन आयटी कंपन्यांची चौथ्या तिमाहीतील कमाई आणि अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून मे मध्ये व्याजदर वाढ होण्याची शक्यता असल्याने गुंतवणूकदारांच्या भावना दुखावल्या. परिणामी भारतीय शेअर बाजारात सुरुवातीलाच मोठे नुकसान दिसून आले. सुरुवातीच्या व्यवहारात IT निर्देशांक सुमारे ७ टक्क्यांनी घसरला. सेन्सेक्सवर इन्फोसिस, टेक महिंद्रा हे टॉप लूजर्स होते. विप्रो, एचसीएल टेक, टीसीएस, एचडीएफसी बँक, एचडीएफसी आणि एनटीपीसी हेदेखील लाल चिन्हात खुले झाले.

निफ्टी आयटी ६.७१ टक्के, निफ्टी फायनान्सियल सर्व्हिसेस ०.२८ टक्क्यांनी घसरला. मीडिया, मेटल, हेल्थकेअर, कंन्झूमर ड्युराब्लेस, ऑईल अँड गॅस हे क्षेत्रीय निर्देशांकही घसरणीसह खुले झाले.

अमेरिकेतील आर्थिक स्थितीचा मागोवा घेत आशिया बाजारातील गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आहे. दरम्यान, सुरुवातीच्या व्यवहारात भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत ५ पैशांनी घसरून ८१.९० वर खुला झाला.

Infosys च्या नफ्यात घट, शेअर्स ११ टक्क्यांनी घसरले

सोमवारी Infosys चे शेअर्स १२ टक्क्यांनी घसरले. इन्फोसिसने चौथ्या तिमाहीतील कमाईत ८ टक्के वाढ नोंदवून ६,१२८ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला. तर महसूल १६ टक्के वाढून ३७,४४१ कोटी रुपयांवर पोहोचला. Infosys चा महसूल आणि नफा हा विश्लेषकांच्या मांडलेल्या अंदाजाच्या तुलनेत कमी आहे. यामुळे इन्फोसिसचे शेअर्स कोसळले आहेत. (Stock Market Crash)

[web_stories title="true" excerpt="true" author="false" date="true" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="1" order="DESC" orderby="post_date" view="list" /]

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news