

पुढारी ऑनलाईन : जागतिक संकेत संमिश्र असतानाही टाटा मोटर्स आणि डीएलएफ लिमिटेडची मजबूत कमाई आणि देशांतर्गत किरकोळ महागाई दर कमी होण्याच्या शक्यतेने आज सोमवारी भारतीय शेअर बाजारात तेजी राहिली. सेन्सेक्स (sensex today), निफ्टीने (Nifty) आज पाच महिन्यांतील उच्चांक गाठला. दुपारी सेन्सेक्स ५०० अंकांनी वाढून ६२,५४५ वर गेला. आजच्या ट्रेडिंग सत्रात निफ्टी ५० हा पाच महिन्यांच्या उच्चांकाच्या जवळ पोहोचला. निफ्टीने आज १८,४५० चा टप्पा पार केला. त्यानंतर सेन्सेक्स ३१७ अंकांनी वाढून ६२,३४५ वर बंद झाला. तर निफ्टी ८४ अंकांच्या वाढीसह १८,३९८ वर स्थिरावला. (Stock Market Closing)
सुरुवातीला सेन्सेक्स २०० हून अधिक अंकांनी वाढून ६२,२०० वर तर निफ्टी १८,३६० वर होता. त्यानंतर दोन्ही निर्देशांकांची तेजी वाढत गेली. आजच्या बाजारातील तेजीत रियल्टी आणि ऑटो स्टॉक्स आघाडीवर होते.
सेन्सेक्सवर (bse sensex today) टाटा मोटर्सचा शेअर टॉप गेनर राहिला. हा शेअर ४ टक्क्यांहून अधिक वाढला. टाटा मोटर्सने चौथ्या तिमाहीत ५,४०७ कोटींचा निव्वळ नफा कमवला आहे. यामुळे त्यांचे शेअर वधारले आहेत. टाटा मोटर्सच्या शेअरची किंमत आज सोमवारी ५३७.१५ रुपयांवर पोहोचली. हा या शेअरचा ५२ आठवड्यांतील उच्चांक आहे. दरम्यान, Hero MotoCorp ४ टक्के वाढून २,७१० रुपयांवर पोहोचला.
निफ्टी बँक (Nifty Bank) आज सर्वकालिन उच्चांकाजवळ म्हणजेच ४४,१५१ वर पोहोचला. आज दुपारी अडीचच्या सुमारास १२ शेअर्सचा समावेश असलेल्या या निर्देशांकाने २९८ अंकांनी वाढून ४४,०९२ वर व्यवहार केला. या निर्देशांकात बँक ऑफ बडोदा, बंधन बँक आणि IDFC First Bank हे शेअर्स टॉप गेनर होते. हे शेअर्स आज अनुक्रमे २.५ टक्के, २.२ टक्के आणि १.४ टक्क्यांनी वाढले होते.
सेन्सेक्सवर टाटा मोटर्स, टेक महिंद्रा, आयटीसी, एचयूएल, लार्सेन हे शेअर्स टॉप गेनर्स होते. तर मारुती सुझुकी, सन फार्मा, टीसीएस, नेस्ले हे शेअर्स टॉप लूजर्स होते.
NSE निफ्टी निर्देशांकावर टाटा मोटर्स, Hero MotoCorp, टेक महिंद्रा, Coal India आणि Infosys हे शेअर्स वधारले होते. अदानी एंटरप्रायझेस, सिप्ला, Divi's Lab, ग्रासीम, बीपीसीएल हे शेअर्स घसरले. अदानी एंटरप्रायजेसचा शेअर सुमारे ३ टक्क्यांनी खाली आला.
जपानी शेअर्स सोमवारी उच्च पातळीवर जाऊन बंद झाले. निक्केई (Nikkei) निर्देशाकांने एक- दीड वर्षातील उच्चांक गाठला आहे. कारण गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात खरेदीचा जोर दिसून आला. Nikkei निर्देशांक सरासरी ०.८ टक्के वाढून २९,६२६ वर पोहोचला. तर टॉपिक्स निर्देशांक ०.९ टक्के वाढून २,११४ वर पोहोचला.
हे ही वाचा :