वेध शेअर बाजाराचा : ट्रिगर्सच्या शोधात निफ्टी | पुढारी

वेध शेअर बाजाराचा : ट्रिगर्सच्या शोधात निफ्टी

निफ्टी (18314.90) केवळ 0.32 तेजी, बँक निफ्टी (43793.55) 0.25 टक्के तेजी आणि सेन्सेक्स (62027.90) 0.45 टक्के तेजी, हा एकूण गत सप्ताहाचा सारांश. सर्व निर्देशांकाची परिस्थितीही सारखीच आहे. नाही म्हणायला निफ्टी ऑटो इंडेक्स तेवढा 4.65 टक्के वाढला.

टाटा मोटर्स या सप्ताहात आठ टक्के वाढला. (सध्याचा दर 515.95) हा शेअर आता पूर्वीचा त्याचा 52 विक हायचा उच्चांक मोडून नवीन उच्चांक प्रस्थापित करत ट्रेड करतो आहे. एप्रिलपासून आजअखेर केवळ दीड महिन्यात हा शेअर 24 टक्क्यांनी वाढला आहे. जब्बार लँड रोव्हरच्या विक्रीतील वाढ, कमर्शिअल आणि पॅसेंजर वाहनांच्या विक्रीतील वाढ आणि शिवाय वाहनांच्या किमतीमध्ये कंपनीने केलेली वाढ या बाबींमुळे हा शेअर सावकाशपणे वरवर जातो आहे. रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टओलिओमधील हा शेअर आहे. हे आपल्याजा माहीत असेलच.

परंतु, टाटा मोटर्सच्या या हळुवार तेजीला दुसरे एक महत्त्वाचे कारण आहे आणि ते म्हणजे टाटा टेक्नॉलॉजीसचा येऊ घातलेला IPO! या कंपनीमध्ये टाटा मोटर्सचा पंचाहत्तर टक्के भाग हिस्सा आहे. ग्लोबली इंजिनिअरिंग सर्व्हिसेस देणारी टाटा टेक्नॉलॉजी ही कंपनी आहे. तिची IPO प्राईस रु. 268/- असेल, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. टाटा मोटर्सकडे असलेल्या टाटा टेक्नॉलॉजीच्या शेअर्सपैकी मोठा वाटा या IPO द्वारे बाजारात विकला जाईल आणि त्याचा थेट फायदा टाटा मोटर्सच्या बॅलन्सशीट सुधारण्यामध्ये होईल. रु. 500 ला त्या शेअरने आपले Base formation पक्के केले आणि रु. 550 चा टप्पा पार केला, तर 2026 अखेरीस हा शेअर रु. 750 पर्यंत जाईल, असे तज्ज्ञांचे भाकीत आहे.

टाटा मोटर्सच्या बरोबरीने गेल्या आठवड्यात इंडसइंड बँक (सध्याचा भाव रु. 1208.65) आहे. आठ टक्के, तर आयशर मोटर्स (रु. 3626.35) सात टक्के वाढला, तर घसरलेल्या शेअर्समध्ये डॉ. रेडीज लॅबज (रु. 4466.10) पावणे दहा टक्के घसरला. हिंदाल्को (रु. 404.75) आठ टक्के घसरतात आणि एल अँड टी (रु. 2221.10) साडेसहा टक्के घसरण याचा समावेश होता.

परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा भारतीय बाजारात खरेदीचा सपाटा 26 एप्रिलपासून अगदी अव्याहतपणे सुरू आहे. गेल्या सप्ताहातही रु. 7750.40 कोटीची नक्त खरेदी त्यांनी केली. त्यांची उत्साहात खरेदी ही रिटेल गुंतवणूकदारांनाही आश्वासित करते. एप्रिल महिन्याची FII Buying ची आकडेवारी पाहिली, तर असे दिसून येते की, बँकिंग अँड फायनान्शिअल सर्व्हिसेस सेक्टरमधील कंपन्यांच्या शेअर्स खरेदीवर त्यांचा भर सर्वाधिक आहे. त्या खालोखाल IT, FMCG, Auto सेक्टरकडेही त्यांचा कल आहे. बँकिंग अँड फायनान्शिअल सेक्टर ज्यामध्ये बँका, नॉन बँकिंग फायनान्स कंपन्या, इन्श्युरन्स कंपन्या आदींचा समावेश होतो. यामधील FII चा वाटा होता. जवळपास 35 टक्के यावरून बँकिंग सेक्टरवर बाजार किती Billish आहे ते दिसून येते.

टाटा मोटर्सच्या बरोबरीने पॉवर ग्रीड आणि अल्ट्राटेक सिमेंट या शेअर्सनीसुद्धा 52 Week High चा नवीन विक्रम प्रस्थापित केला.

मेनन बेअरिंग्ज हा शेअर मागील आठवड्यात साडेसोळा टक्के वाढला. शुक्रवारचा त्याचा बंदभाव होता रु. 129.80. मागील एका वर्षात तो साडे त्र्याहत्तर टक्के वाढला आहे. हेव्ही आणि लाईट कमर्शिअल व्हेईकल, ट्रॅक्टर्स, डिझेल इंजिन्स यांना लागणारी बेअरिंग्ज, बुशेस, वॉशर्स ही कंपनी बनवते. सातत्याने नफा कमविणारी आणि डिव्हिडंड देणारी ही कंपनी आहे. तीन वर्षांची सरासरी विक्री वाढ 16 टक्के, नफा वाढ 31 टक्के आहे. हा शेअर दमदारपणे रु. 200 च्या दिशेने वाटचाल करतो आहे आणि अल्पावधीतच तो 200 चा टप्पा गाठेल, असा विश्वास वाटतो.

भरत साळोखे,
संचालक, अक्षय प्रॉफिट अँड वेल्थ प्रा.लि.

Back to top button