

पुढारी ऑनलाईन डेस्क : जागतिक सकारात्मक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टी बुधवारी (दि.२४) सलग चौथ्या सत्रांत वधारून बंद झाले. सेन्सेक्स ११४ अंकांनी वाढून ७३,८५२ वर स्थिरावला. तर एनएसई निफ्टी ३४ अंकांच्या वाढीसह २२,४०२ वर बंद झाला. बीएसई मिडकॅप ०.९ टक्क्यांनी आणि स्मॉलकॅप ०.८ टक्क्यांनी वाढून बंद झाला. बाजारात सर्वाधिक खरेदी मेटल आणि हेल्थकेअर क्षेत्रातील शेअर्समध्ये दिसून आली. तर आयटी आणि मीडिया शेअर्समध्ये विक्रीचा मारा झाला. (Stock Market Closing Bell)
मिडकॅप, स्मॉलकॅप शेअर्समध्ये खरेदी झाली. निफ्टी बँकदेखील वाढून बंद झाला. रियल्टी, फार्मा निर्देशांकही वाढला. पण आयटी आणि ऑटो शेअर्समध्ये दबाव दिसून आला.
सेन्सेक्सने आज ७३,८८० च्या पातळीवर व्यवहार केला. सेन्सेक्सवर जेएसडब्ल्यू स्टील, टाटा स्टील, पॉवर ग्रिड, कोटक बँक, अल्ट्राटेक सिमेंट, एनटीपीसी, बजाज फायनान्स, एलटी हे शेअर्स तेजीत राहिले. तर टेक महिंद्रा, टीसीएस, मारुती, रिलायन्स, इन्फोसिस, टायटन हे शेअर्स घसरले.
निफ्टीवर हिंदाल्को, सिप्ला, जेएसडब्ल्यू स्टील, टाटा स्टील, पॉवर ग्रिड हे शेअर्स टॉप गेनर्स राहिले. निफ्टीवर टाटा कंझ्यूमरचा शेअर्स टॉप लूजर ठरला. हा शेअर्स तब्बल ५ टक्क्यांनी घसरला. त्याचसोबत ग्रासीम, बजाज ऑटो, टेक महिंद्रा, एचडीएफसी लाईफ हे शेअर्सही प्रत्येकी १ टक्क्यांनी खाली आले. (Stock Market Closing Bell)
टाटा कंझ्युमरला फटका
FMCG क्षेत्रातील प्रमुख टाटा कंझ्युमरचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडमध्ये बीएसईवर ५ टक्क्यांनी घसरून १,१११ रुपयांपर्यंत खाली आले. Tata Consumer चा मार्च तिमाहीचा एकत्रित निव्वळ नफा वर्ष १९ टक्क्यांनी घसरून २१७ कोटी रुपये झाला आहे. टाटा कंझ्युमरची तिमाही आकडेवारी गुंतवणूकदारांना प्रभावित करण्यात अयशस्वी ठरली. यामुळे त्यांचे शेअर्स घसरले आहेत. (Tata Consumer Products Share Price)
हे ही वाचा :