

पुढारी ऑनलाईन
नेतृत्वाचे एक स्किल आहे. सहकार्यांना शब्द द्यायचा आणि खोटा विश्वास निर्माण करायचा हेच काम गेले अडीच वर्ष शिवसेनेच्या नेतृत्वाने केले आहे. त्यामुळे शिवसेने बरोबर मविआ मधील अनेक आमदार नाराज आहेत. मविआ सरकार ही फक्त सेटलमेंट होती. यामुळेच काही नेते आपण कधी यातून बाहेर पडणार असा प्रश्न विचारत होते, त्यामुळेच पक्षात फुट पडत असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेनेच्या राजकीय नाट्यावर समजनेवोलों को ईशारा ही काफी है, असे स्पष्ट करत पुढे काय हाेईल, हे माहित नाही सध्या तरी वेट अँड वाॅच ( थांबा आणि पाहा ) अशी आमची भूमिका आहे, असे सूचक विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज केले.
भाजपने विधान परिषद विजयानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील म्हणाले, विधान परिषदेच्या दहा जागांसाठी उभा केलेल्या उमेदवारांपैकी भाजपचे पाचही उमेदवार निवडून आले. भाजपला सहकार्य करणाऱ्या सर्व नेते, कार्यकर्त्यांचा मी आभारी आहे. या निवडणुकीत अपक्षांचा भाव वाढला. भाजपला स्वत:ची ताकद मिळाली आहे. जे होतं ते चांगल्यासाठीच होते, असेही ते म्हणाले.
मविआच्या नाराज आमदारांची आम्हाला मदत झाली. शिंदेंनी भाजपला प्रस्ताव दिलेला नाही. अद्याप आमचा एकनाथ शिंदेशी कोणताही संपर्क किंवा चर्चा झाली नाही. पुढे काय होईल ते सांगता येणार नाही. सध्या तरी वेट अँड वाॅच असेही ते म्हणाले.
हेही वाचा :