

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांची मंत्रलायातील मृद व जलसंधारण विभागाच्या रिक्त असलेल्या सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर चव्हाण यांच्या बदलीने रिक्त होणार्या कृषी आयुक्तपदी डॉ. प्रवीण गेडाम यांच्या नियुक्तीचे आदेश शासनाने दिले आहेत. चव्हाण यांनी नव्या पदाचा पदभार एकनाथ डवले यांच्याकडून त्वरित स्विकारण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागााचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी जरी केले आहेत. त्यामुळे शुक्रवारी ते आपल्या पदाचा पदभार स्विकातील, अशी माहिती आयुक्तालयातून मिळाली. दरम्यान, चव्हाण यांच्या कृषी आयुक्त पदाच्या कारकिर्दीत मुख्यालयात कोट्यावधी रुपयांचा चुराडा करुन गरज नसताना करण्यात आलेले फर्निचर व सुशोभीकरणावरील उधळपट्टीचा विषय चव्हाट्यावर आला होता.
दै. पुढारीने या विषयाला वाचा फोडली होती. त्यामध्ये सुस्थितीत असलेले कृषी आयुक्तांचे दालन, शेजारील छोटा हॉल आणि पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सभागृहाचे नुतनीकरणावर सुमारे सव्वा कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे स्पष्ट झाल्याने हा विषय वादग्रस्त ठरला होता. नवीन कृषी आयुक्त डॉ. गेडाम हे सध्या केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. त्यांनी महाराष्ट्रात यापुर्वी अनेक महत्वांच्या पदांवर काम केले आहे. त्यामध्ये नाशिक, जळगांव येथे महापालिका आयुक्त, सोलापूर आणि उस्माणाबाद येथे जिल्हाधिकारी, लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, परिवहन आयुक्त, भुजल सर्वेक्षण आणि विकास संस्थेचे संचालक आदी महत्वपूर्ण पदांचा समावेश आहे. शुक्रवारी ते कृषी आयुक्त पदाचा पदभार स्विकारणात असल्याचे सांगण्यात आले.
हेही वाचा :