पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज शाहीन आफ्रिदी दुखापतीच्या उपचारासाठी लंडनला रवाना

पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज शाहीन आफ्रिदी दुखापतीच्या उपचारासाठी लंडनला रवाना
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानचा अव्वल वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीच्या गुडघ्याच्या दुखापतीवर लंडनमध्ये उपचार होणार असून ऑक्टोबरमध्ये सुरू होणाऱ्या टी-२० विश्वचषकापूर्वी तो तंदुरुस्त होण्याची अपेक्षा आहे. शाहीन शाह आफ्रिदी उपचार आणि पुनर्वसनासाठी लंडनला रवाना झाला आहे. जुलैमध्ये गाले येथे श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान त्याला ही दुखापत झाली होती.

या दुखापतीमुळे शाहीन शाह आफ्रिदी श्रीलंकेविरुद्धची दुसरी कसोटी आणि नेदरलँड्समधील एकदिवसीय मालिकेनंतर सुरू असलेल्या आशिया कपमधून बाहेर पडला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सोमवारी जाहीर केले की शाहीन शाह आफ्रिदी लंडनला रवाना झाला आहे.

पीसीबीचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नजीबुल्ला सूमरो म्हणाले, "शाहीन शाह आफ्रिदीला दुखापतीतून सावरण्यासाठी विश्रांतीची गरज आहे आणि लंडनमध्ये जगातील सर्वोत्तम क्रीडा औषधी आणि पुनर्वसन सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे आम्ही त्याला तिथे पाठवण्याचा निर्णय घेतला."

लंडनमध्ये शाहीन पीसीबी वैद्यकीय सल्लागारांच्या देखरेखी खाली असेल, ज्यात लंडनमधील डॉ. इम्तियाज अहमद आणि डॉ. जफर इक्बाल यांचा समावेश आहे. २०१६ पासून डॉ. इम्तियाझ क्वीन्स पार्क रेंजर्स फुटबॉल क्लबमध्ये वैद्यकीय सेवा प्रमुख आहेत, तर डॉ. जफर २०१५ पासून क्रिस्टल पॅलेस फुटबॉल क्लबमध्ये स्पोर्ट्स मेडिसिनचे प्रमुख आहेत, त्यांनी लिव्हरपूल FC आणि केंट काउंटी क्लबमध्ये काम केले आहे.

जुलैमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत क्षेत्ररक्षण करताना शाहीनला दुखापत झाली होती. ICC टी२० विश्वचषक २०२२ पूर्वी तो पूर्णपणे तंदुरुस्त होईल अशी अपेक्षा आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news