नोव्हाक जोकोविच याने सहाव्यांदा विंबल्डनवर कोरले नाव

जोकोविचने सहाव्यांदा विंबल्डन जिंकली.
जोकोविचने सहाव्यांदा विंबल्डन जिंकली.
Published on
Updated on

लंडन; पुढारी ऑनलाईन : नोव्हाक जोकोविच हे नाव विंबल्डनवर सहाव्यांदा कोरले गेले. पण, या विजयाबरोबरच त्याने एक इतिहास घडवला. त्याने आपल्या कारकिर्दितले २० वे ग्रँडस्लॅम जिंकत सर्वाधिक ग्रँडस्लँम जिंकणाऱ्यांच्या यादीत टाय घडवला. तो आता या यादीत रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांच्या बरोबरीने अव्वल स्थानावर पोहचला आहे.

पहिल्याच सेटमध्ये जोकोविचला धक्का

यंदाच्या विंबल्डन फायनलमध्ये नोव्हाक जोकोविच ला माटेओ बेरेटिनी याने पहिल्याच सेटमध्ये धक्का दिला. बेरेटिनीने पिछाडी भरुन काढत पहिला सेट ६- ७ ( ४- ७ ) असा जिंकला. पण, त्यानंतर नोव्हाक जोकोविचने दुसऱ्या सेटमध्ये पुनरागमन करत सेट ६ – ४ असा आपल्या नावावर केला.

तिसऱ्या सेटमध्येही जोकोविचने आपली पकड ढिली न होऊ देता सेट ६ – ४ अशा खिशात घातला. सामन्यावर पकड मिळाल्यानंतर जोकोविचने चौथ्या आणि निर्णायक सेटमध्ये बेरेटिनीला ६ – ३ अशी सहज मात देत आपले सहावे विंबल्डन जिंकले. याचबरोबर त्याची एकूण ग्रँडस्लॅमची टोटल २० पर्यंत पोहचली.

अधिक वाचा :

टेनिसचा गोल्डन एरा 

नोव्हाक जोकोविच ने आज आपले २० वे ग्रँडस्लॅम जिंकले. याचबरोबर त्याने रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांच्याबरोबर सर्वाधिक ग्रँड स्लॅम जिंकणाऱ्यांच्या यादीत अव्वल स्थानासाठी बरोबरी केली आहे.  फेडरर आणि नदालनेही आतापर्यंत २० ग्रँड स्लॅम जिंकले आहेत. त्यामुळे या तिघांची मिळून आता ६० ग्रँड स्लॅम झाली आहेत. हा टेनिसमधील गोल्डन एराच म्हणावा लागेल.

जोकोविचने यंदाच्या कॅलेंडर वर्षात तीन प्रमुख ग्रँड स्लॅम जिंकल्या आहेत. अजून एक तिमाही शिल्लक असून जर जोकोविचने सप्टेंबरमध्ये होणारी युएस ओपन जिंकली तर १९६७ नंतर एकाच कॅलेंडल वर्षात चारही प्रमुख ग्रँड स्लॅम जिंकण्याची तो करामत करेल. याचबरोबर तो अशी कामगिरी करणारा इतिहासातील तिसरा टेनसपटू ठरेल.

यापूर्वी अशी कामगिरी डॉन बज ( १९३८ ) आणि रॉड लॅव्हर ( १९६२ आणि १९६९ ) या दोघांनी केली आहे. जोकोविचने आतापर्यंत ६ विंबल्डन, ९ ऑस्ट्रेलियन ओपन , २ फ्रेंच ओपन आणि ३ युएस ओपन जिंकल्या आहेत.

हे ही वाचले का?

पाहा : अॅश्ले बार्टीचा क्रिकेट ते विंबल्डन विजेता होण्याचा प्रवास 

[visual_portfolio id="5340"]

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news