FIFA World Cup Day 4 : जिगरबाज जपानने बलाढ्य नेदरलँड्सला बरोबरीत रोखले, जर्मनीने कुरासाओवर डागले तब्बल ७ गोल

FIFA World Cup Day 4 : आयव्हरी कोस्टने बाद फेरीतील आशा ठेवल्या जिवंत
FIFA World Cup Day 4
जपानने शेवटच्या क्षणी केलेल्या जिगरबाज खेळीने बलाढ्य नेदरलँड संघाला बरोबरीत रोखलेPudhari
Published on
Updated on

FIFA World Cup Day 4 : फिफा विश्वचषकातील रविवारी (दि. १४ जून) झालेल्या सामन्यांमध्ये तीन परस्परविरोधी खेळ पाहायला मिळाले. जपानने शेवटच्या क्षणी केलेल्या जिगरबाज खेळीने बलाढ्य नेदरलँड संघाला बरोबरीत रोखले. ह्युस्टनमध्ये, जर्मनीने कुरासाओचा धुव्वा उडवत 'गट ई' (Group E) मध्ये अव्वल स्थान पटकावले; तर दुसरीकडे, अमाद डियालोच्या निर्णायक गोलच्या जोरावर इक्वेडोरचा पराभव करून आयव्हरी कोस्टने बाद फेरीतील आपली आशा जिवंत ठेवली आहे.

जिगरबाज जपानने नेदरलँड्सला रोखले

जपानचा संघ फुटबॉल जगतात 'जायंट किलर' म्हणून ओळखला जातो. चार वर्षांपूर्वी कतारमध्ये झालेल्या विश्वचषकात जपानने गट फेरीत जर्मनी आणि स्पेनचा पराभव केला होता. २०१८ च्या विश्वचषकात त्यांनी कोलंबियाला धूळ चारली होती. गेल्या चार विश्वचषकांपैकी तीनमध्ये जपानने विश्वचषकाची सुरुवात विजयाने केली होती. रविवारी झालेल्या सामन्यात नेदरलँड्सविरुद्ध दोनदा पिछाडीवर पडल्यानंतरही जपानने जोरदार पुनरामगन केले. या सामन्यात दोन्ही संघांना पहिले ५० मिनिटे गोल करता आला नाही. मात्र, त्यानंतर पुढील १४ मिनिटांत सामन्यात तीन गोल पाहायला मिळाले.

FIFA World Cup Day 4
FIFA World Cup : भांडी घासणारा.. पोस्टमन अन् नवख्यांची टोळी; 'या' 6 सामन्यांनी रडवलं होतं फुटबॉलच्या महासत्तांना!

अखेरच्या दोन मिनिटात जपानच्या कामादाने केली कमाल

प्रथम व्हर्जिल व्हॅन डायकने हेडरद्वारे शानदार गोल करत नेदरलँड्सला १-० अशी आघाडी मिळवून दिली. हा आनंद अल्पकाळच टिकला. यानंतर अवघ्या सात मिनिटांनंतर केइतो नाकामुराने गोल करून जपानला बरोबरी साधून दिली. त्यानंतर क्रायसेन्सियो समरव्हिलने गोल करत नेदरलँड्सला २-१ असे पुढे नेले. आता जपानचा पराभव निश्चित वाटत असतानाच, सामन्याची नियमित वेळ संपण्यास अवघी दोन मिनिटे शिल्लक असताना दाइची कामादाने गोल करून जपानला २-२ अशी महत्त्वपूर्ण बरोबरी साधून दिली.

FIFA World Cup Day 4
FIFA World Cup Day 3 : स्कॉटलंडचे दमदार पुनरागमन; मोरोक्कोने ब्राझीलला बरोबरीत रोखून सर्वांना केले चकित!

जपानी चाहत्यांनी जिंकली मने; स्टेडियमची केली स्वच्छता

सामन्याच्या शेवटच्या क्षणी गोल करत जपानने नेदरलँड्सला बरोबरीत रोखल्यानंतर, मैदानाबाहेर जपानच्या चाहत्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या एका खास सवयीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ती सवय म्हणजे सामना संपल्यानंतर स्टेडियममधील कचरा साफ करणे. सामना संपण्याच्या दोन मिनिटे आधी कामादाने गोल केल्यावर जपानी चाहत्यांनी निळ्या रंगाच्या कचऱ्याच्या पिशव्या हवेत उडवून जल्लोष केला होता. सामना संपताच त्यांनी त्याच पिशव्यांचा वापर करून स्टेडियममधील सर्व कचरा गोळा केला आणि आसनांची स्वच्छता केली. जपानी चाहत्यांनी स्टेडियम साफ करण्याचे हे दृश्य पहिल्यांदा १९९८ च्या फ्रान्स विश्वचषकादरम्यान जगासमोर आले होते. तेव्हापासून जपानचे चाहते प्रत्येक मोठ्या क्रीडा स्पर्धेत सामना संपल्यानंतर स्टेडियमची स्वतःहून स्वच्छता करण्याची आपली परंपरा अविरतपणे जपत आहेत.

FIFA World Cup Day 4
Mexico Free Condoms FIFA World Cup : 13 सामने.. 70 लाख कंडोमचे मोफत वाटप! मेक्सिकोची भन्नाट तयारी

जर्मनीचा कुरासाओविरुद्ध ७ गोल झळकावत दणदणीत विजय

ग्रुप ई मध्ये जर्मनीने विश्वचषकात पहिल्यांदाच खेळणाऱ्या कुरासाओ संघाचा ७-१ असा पराभव करत आपले इरादे स्पष्ट केले आहेत. चार वेळच्या विश्वविजेत्या जर्मनीने सामन्याच्या सुरुवातीपासूनच आपला दबदबा कायम ठेवला होता. सामन्याच्या ६ व्या मिनिटाला फेलिक्स एनमेचाने फ्लोरियन विर्ट्जसोबत उत्तम ताळमेळ दाखवत पहिला गोल नोंदवला. मात्र, २१ व्या मिनिटाला लिवानो कोमेनेसियाने गोल करून कुरासाओला बरोबरी साधून दिली आणि स्टेडियममधील समर्थकांमध्ये उत्साह भरला. पण यानंतर जर्मनीने प्रतिस्पर्द्यांना कोणतीही संधी दिली नाही. ३८ व्या मिनिटाला निको श्लोटरबेकने कॉर्नरवर हेडरद्वारे गोल केला. पहिल्या हाफच्या अतिरिक्त वेळेत काई हावर्ट्झने पेनल्टीचे गोलमध्ये रूपांतर करून स्कोअर ३-१ असा केला. दुसऱ्या हाफमध्ये जर्मन आक्रमण अधिकच धारदार झाले. ४७ व्या मिनिटाला जमाल मुसियालाने जोशुआ किमिचच्या पासवर गोल केला. यानंतर नथानिएल ब्राउन, डेनिज उंडाव आणि पुन्हा हावर्ट्झने गोल करत विजयाचा फरक आणखी वाढवला. हावर्ट्झने सामन्यात दोन गोल करत आपला थसा उमटवला, त्याला 'प्लेअर ऑफ द मॅच' म्हणून गौरविण्यात आले.

FIFA World Cup Day 4
FIFA World Cup 2026 : फुटबॉल विश्वचषकात सर्वात जलद गोल आहे कोणाच्या नावावर...? जाणून घ्या ५ भन्नाट गोष्टी

मॅन्युएल नॉयरच्या नावावर नवा विक्रम

जर्मनीचा अनुभवी गोलरक्षक मॅन्युएल नॉयरने आपल्या नावावर नवा विक्रम रचला आहे. ४० वर्षे आणि ७९ दिवस या वयात कोणत्याही मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळणारा तो जर्मनीचा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. त्याने लोथार मथायसचा विक्रम मोडीत केला.

FIFA World Cup Day 4
Nora Fatehi: नोरा फतेहीचा फिफा विश्वचषकाच्या उद्घाटन सोहळ्यात दमदार परफॉर्मन्स; पाहा VIDEO

आयव्हरी कोस्टचा विजय, इक्वेडोरला धक्का

दिवसातील तिसऱ्या सामन्यात आयव्हरी कोस्ट आणि इक्वेडोर यांच्यात अटीतटीची लढत पाहायला मिळाली. दोन्ही संघांनी संपूर्ण सामन्यात एकमेकांना तोडीस तोड टक्कर दिली, पण शेवटी विजय आयव्हरी कोस्टच्या पदरात पडला. सामन्याच्या बहुतांश वेळेत दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले. इक्वेडोरने अनेकदा आक्रमणे केली, परंतु आयव्हरी कोस्टच्या बचावफळीने (Defenders) ती यशस्वीपणे मोडून काढली. सामना ड्रॉ कडे सरकत असतानाच, अमाद डियालोने निर्णायक क्षणी गोल करून आपल्या संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. डियालोच्या या गोलमुळे आयव्हरी कोस्टला तीन महत्त्वाचे गुण मिळाले असून संघ गुणतालिकेत जर्मनीच्या बरोबरीने पोहोचला आहे. आता २१ जून रोजी जर्मनी आणि आयव्हरी कोस्ट यांच्यात होणारा सामना या ग्रुपमधील अव्वल संघ ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल.

logo
Pudhari News
pudhari.news